
प्रतिनिधी : उत्कर्ष बोर्ले
मुंबई : गोरेगाव पश्चिम येथे भाकर फाऊंडेशनच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना “विद्यार्थी गौरव सन्मान २०२५” देऊन गौरविण्यात आले. शिक्षणात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सन्मान देत त्यांचा उत्साह वाढवण्याचा उद्देश या उपक्रमामागे होता.
यावेळी भाकर फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष ॲड. दिपक सोनावणे, मंगला कुमठे, आकाश क्षिरसागर, मयूर जाधव, करूणा सोनावळे उपस्थित होते.
खूपच छान