लोकांच्या चुकीसाठी, जनतेच्या पैशांची खैरात का?

Share


प्रतिनिधी:सुरेश बोरले

सरकार नेहमीच लोकांच्या संरक्षणाची जबाबदारी घेत असते.परंतु लोकांना,ह्या गोष्टीचे महत्व कळत नाही.उदा.द्यायचे झाल्यास!सामुद्रिक तुफांनाचे देत येईल.सरकार जेव्हा हवामान खात्या कडून,संदेश आल्यावर!बंदरावर ठराविक रंगाचा ध्वज फडकावते व सूचना माध्यमा तर्फे जाहीर करते की,कुणीही समुद्रात उत्रू नये.तरीही कांहीं कोळी बांधव, समद्रात मासेमारीला जातात व मृत्युमुखी पडतात. ह्याला सरकार जबाबदार आहे का?मग राजकरणी येतात,सात्वन करण्याचे नाटक करतात आणि ताबडतोब लाखोंची मदत जाहीर करतात.त्या राज करण्यांनच्या खिशातून काय जातय?पैसा जनतेचा!निष्काळजी व बेफिकीर लोकांसाठी वायफळ जातोय.नुकतीच लोणावळा ह्या पर्यटक स्थळी बुशी धरणावर,एक दुःखद घटना घडली!गतिमान प्रवाहात,एक संपूर्ण कुटुंब वाहून गेलं.ही चुकी कुणाची?त्वरित उप मुख्य-मत्र्यांनी प्रत्येकी रु.5 लाखांची मदत जाहीर केली. वॉ! आधी लोकांचा निष्काळजीपणा पहा ना?त्या कुटुंबाने अश्या प्रवाहात का जायचे? का प्रवाह त्यांना कळला नाही का?ज्यांना आवशकता आहे त्यांना आपण मदत करीत नाही.मात्र अशा लोकांना करताय.नुकतीच उत्तर प्रदेशात, हाथरस ह्या ठिकाणी मोठी दुर्घटना घडली.”भोला बाबा” ह्यांच्या सतसंगात झालेल्या गर्दीत 121 लोक चिरडून ठार जाले. हजारो लोक जखमी झालेले आहेत.आता हीच लोक!त्या बाबाच्या नावाने बोट मोडीत त्याला शिव्या शाप देत आहेत.अरे नालायकांनो!अंधश्रद्धा घेऊन का जाता कुण्या कोणत्याही बाबांकडे? जिवावर बेतला की बाबा खराब.मग आधि विचार करा?त्या सरकारनेही,प्रतेकाला मदत जाहीर केलेली आहे.म्हणजे हल्कटपणा बेजबाबदार लोकांनी करायचा,भुर्दंड सामान्य जनतेने सोसायचा.ज्यात त्यांचा काहीच दोष नाही.मग त्या भोला बाबाची पोल आता खुलत आहे,त्याची संपत्ती विका व करा पिडीत्तांना मदत काय हरकत आहे?म्हणजे हे राजकारणीच याला जवाबदार आहेत.घटना घटली की श्रेय घ्यायला जायचे व जनतेच्या पैशावर खैराती वाटायच्या .आधी ह्या राजकीय नेत्यांसाठी, कडक कायदे व्हावेत! कारण जनतेच्या पैशांनची बरबादी टळावी!हाच येथे हेतू आहे.योग्य शहानिशा व चुक कुणाची आहे! पिडीतानची काय परिस्थिती आहे आणि मगच ह्या बडव्यांना पैसे वाटप करण्याचा अधिकार द्यावा.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *