
प्रतिनिधी:हरिनाथ यादव
मुंबई : वडार समाजाची संघटना “मी वडार महाराष्ट्राचा” बैठक पार पडली त्यात संस्थापक अध्यक्ष, माजी राज्यमंत्री आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनात
अनेक संस्थांशी निगडीत सामाजिक कार्यकर्ते बाबण्णा कुशालकर यांची मुंबई अध्यक्षपदासाठी एकमताने निवड करण्यात आली. सोबतच समाजाची संपूर्ण समिती जाहीर करण्यात आली.
उपाध्यक्ष चंद्रकांत मंजाळ, सचिव रमेश धोत्रे, कार्याध्यक्ष राजू जाधव, संपर्क प्रमुख अजय शेलार यांनी केल्याचे वडार समाजाचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाबण्णा कुशालकर यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुधीर पवार, राजू सांडू उपस्थित होते.
बाबण्णा कुशालकर यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने लोखंडे, धोत्रे, पवार, जाधव, बनपट्टे, माने, इटकर, मंजुळे, इलकल, मलंग, देवकुळे, संजय जाधव, परशुराम देवकुळे, कृष्णा माने, शतराज यांच्यासह अनेक सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. वारकऱ्यांचे राजकीय व पक्षांच्या लोकांनी फुले देऊन स्वागत केले.