
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मुंबई: वडाळा.शांती नगर,वसंतदादा पाटील मार्ग,वडाळा (पुर्व) येथील नाला तुडुंब भरल्याने पाणी शिरले नागरिकांच्या घरात. या नालायची सफाई च्या नावावर देखावा केल्याचे स्थानिक शिवसेना शाखा प्रमुख संजय आशा बंसी रणदिवे यांनी आरोप केले आहेत. त्यांच्या मते गाळ निट उपसले नाही त्यामुळे नाल्यातून पाण्याचा निचरा होत नाही आणि नाला तुडुंब भरल्याने घाण पाणी लगत च्या वस्तीतील नागरिकांच्या घरात शिरल्याने येथील रहिवाशांना त्रास सहन करावे लागले तसेच चाकर्मान्यांना कामावर जाने टाळावे लागले कारण घरातील भरलेल्या पाण्याचा उपसा करण्यातच त्यांचा अधीक चा वेळ पाणी उपासनातच गेला. तसेच या नालायची सफाई निट झाली नसल्याची तक्रार
दिनांक २ जुलै व २९ जुलै रोजी स्थानिक शिवसैनिक संजय रणदिवे यांनी केली होती परंतु ठेकेदाराने पालिका अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना गंडवले व साफ केलाच नाही.आजच्या मुसळधार पाऊसामुळे लोकांच्या घरात पाणी गेले.आज शिवसेना शाखा प्रमुख संजय आशा बन्सी रणदिवे यांनी खाजगी जेसीबी बोलुन हा नाला स्वता तात्तपुरता साफ करुन घेतला.त्यामुळे लोकांच्या घरातील पाणी कमी झाले.तरी याकडे मनपा अधिकारी दुर्लक्ष करुन ठेकेदारांचे बिल पास करणार का असा प्रश्न ही येथे उपस्थित होत आहे.

BMC तुझ्या contractor वर भरोसा नायग