
प्रतिनिधी :मिलन शहा
मुंबई,भाजपाचे सरकार केंद्रात सत्तेवर आल्यापासून सर्वच स्तरावर सपशेल फेल झाले आहे.दर वर्षी 2 कोटी नोकऱ्या देण्याचे स्वप्न दाखवणारे मोदी तरुणांच्या हाताला काम देण्यात भाजपा सरकार अपयशी ठरले असून बेरोजगारी ही मोठी चिंता करायला लावणारी आहे. महागाई व बेरोजगारीचे आकडे दिवसेंदिवस वाढतच आहेत. डिसेंबर महिन्यात बेरोजगारीचा दर 8 टक्के पेक्षा अधिक झाला असून शिक्षण घेऊन नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांचे स्वप्न अंधःकारमय झाले आहे परंतु मोदी सरकारला त्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही अशी टीका स्लम सेल विभागाचे मुंबई अध्यक्ष व काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे.
देशात तरुण वर्गाची संख्या जवळपास 65 टक्के असून शिक्षण घेऊन ते वर्षानुवर्षे नोकरीची प्रतिक्षाच करत आहेत. मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे 45 वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी झाली आहे. नवीन रोजगार निर्मिती होत नाही तर उलट आहे तेच रोजगार कमी होत आहेत. नोटबंदी व जीएसटीची चुकीच्या पद्धतीने केलेली अंमलबजावणी यामुळे नोकरी देऊ शकणारे क्षेत्रच उद्ध्वस्थ होत चालले आहे तर दुसरीकडे खाजगीकरणाचा सपाटा लावून सार्वजनिक उद्योग विकले जात आहेत असेही राजहंस म्हणाले.