वांद्रे ते दहिसरमधील ८०० शाळांतून अस्मिता शाळेचा प्रकल्प अव्वल..

Share

एसएमएस -प्रतिनिधी – कृष्णा वाघमारे

मुंबई : शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई पश्चिम विभाग यांच्या आयोजनाखाली रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल, दहिसर येथे नुकतेच जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडले.

या विज्ञान प्रदर्शनामध्ये अस्मिता संचालित जमनाधर अग्रवाल माध्यमिक विद्यालय यांचा “किमया अंकगणित (Enjoy Maths from Basic to AI)” हा प्रकल्प मोठ्या गटात (इयत्ता ९ वी ते १२ वी) सर्वोत्कृष्ट प्रकल्प म्हणून गौरविण्यात आला.

या उत्कृष्ट प्रकल्पाची निवड दि. २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ दरम्यान नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी करण्यात आली आहे. वांद्रे ते दहिसर परिसरातील सर्व बोर्ड व सर्व माध्यमांच्या सुमारे ८०० शाळांमधून निवड होणे, ही अस्मिता मराठी शाळेसाठी अत्यंत गौरवास्पद व अभिमानास्पद बाब मानली जात आहे.या यशस्वी प्रकल्पाचे विद्यार्थी निर्माते कुमार पार्थ विजया रुपेश गोळे आणि कुमार शंभूराज दिपाली हेमंत गोळे तसेच मार्गदर्शक शिक्षक विश्वास कनप, भीमराव वळकुंदे आणि पालकांचे शाळेच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

सदर पारितोषिक वितरण समारंभ मुंबई विभाग शिक्षक आमदार ज. मु. अभ्यंकर, शिक्षण निरीक्षक (मुंबई पश्चिम विभाग) संजय जावीर तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडला.

अस्मिता संस्थेच्या ५० व्या वर्धापन वर्षात मिळालेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर पारखी यांनी शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक संतोष फडतरे तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.


Share

3 thoughts on “वांद्रे ते दहिसरमधील ८०० शाळांतून अस्मिता शाळेचा प्रकल्प अव्वल..

  1. खुप सुन्दर मुलानी मेहनत केली आहे उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे मना पासुन आभार व्यक्त करतो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *