
विशेष प्रतिनिधी
मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरातील माहिम ते वांद्रे रिक्लेमेशन या रस्त्याच्या कडेला समुद्राजवळ ड्रग्ज माफियांनी एका हिरव्यागार बागेचा अड्डा बनवला आहे. येथे अल्पवयीन मुलांमार्फत एमडी, ब्राऊन शुगर, गांजा यांसारखे धोकादायक ड्रग्ज खुलेआम विकले जात आहे या बाबत चा विडिओ समाज माध्यमावर व्हारल झाले आहे
काही दिवसांपूर्वी, या बागेत सुमारे 45 वर्षांच्या एका माणसाला ड्रग्ज विकताना पकडण्यात आले. स्थानिक रहिवाशांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली होती, त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत काही लोकांना अटक केली.
पण आज, 27 एप्रिलच्या संध्याकाळी, तीच बाग पुन्हा एकदा ड्रग्ज विक्रीच्या ठिकाणी बदलली जिथे अल्पवयीन मुले उघडपणे ड्रग्ज विकताना दिसली. या बागेत अनेक ड्रग्ज व्यसनी तरुण येताना आणि त्यांच्याकडून ड्रग्ज खरेदी करताना दिसले. महाविद्यालयीन विद्यार्थीही येथून ड्रग्ज घेण्यासाठी रांगेत उभे आहेत, ही चिंतेची बाब आहे.
स्थानिकांचे म्हणणे आहे की जर वांद्रे पोलिस आणि एएनसी (अँटी नार्कोटिक्स सेल) यांनी वेळीच कारवाई केली तर अनेक तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवता येईल.
महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिस सतत ‘ड्रग फ्री मुंबई’ मोहीम राबवत आहेत, परंतु अशा ड्रग्ज अड्ड्यांवर कठोर कारवाई करणे खूप महत्वाचे आहे. या बागेत ड्रग्ज माफिया आणि अल्पवयीन मुलांकडून ड्रग्जचा वापर करणाऱ्यांवर लवकरात लवकर कडक कारवाई करावी, असे आवाहन वांद्रे येथील रहिवाशांनी मुंबई पोलिसांना केले आहे.