
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मुंबई :मालाड मालवणीतील सामाजिक कार्यकर्ते विजय माने यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षात आपल्या शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन प्रवेश केला. रि. पा. ई. चे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत माने यांचा प्रवेश करण्यात आला. विजय माने यांना मालाड तालुका उपाध्यक्ष पद देण्यात आले आहे. पदभार स्वीकारल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेनी माने यांचे अभिनंदन व कौतुक केले.यावेळी मालाड तालुका अध्यक्ष सुनील गमरे, माघाठाने विधानसभा अध्यक्ष अशोक कांबळे, कांदिवली पूर्व विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ कोंडे, शिवराज कोंडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.विजय माने हे मालवणीतील अनेक संघटनामध्ये कार्यरत आहेत. विग्नेश सामाजिक वेलफेअर सेवा संस्था, विग्नेश महिला सेवा संस्था ह्या त्यांच्या संस्था आहेत. विजय माने यांचे चर्मकार समाजाबरोबर इतर समाजातील अनेक संस्था संघटनाशी संबंध आहेत.
दलबदल