
मुंबई : बृहन्मुंबई शिक्षण विभाग (आर-पश्चिम) तर्फे आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन बुधवार ३ नोव्हेंबर ते शुक्रवार ५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सेंट लॉरेन्स हायस्कूल, बोरिवली (प.) येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात सादर करण्यात आलेल्या विविध नाविन्यपूर्ण प्रकल्पांमध्ये ‘आनंददायी जलवाहतूक व्यवस्थापन’ या प्रकल्पाने सर्वांचे विशेष लक्ष वेधले.
हा प्रकल्प मार्गदर्शक शिक्षक श्री. धुमाळ डी. एस. यांच्या मार्गदर्शनाखाली कु. एंजल विकास साठे आणि मासे. रवि अरुण पवार यांनी तयार केला. उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाला तालुकास्तरीय प्रथम क्रमांक मिळाला असून आता या प्रकल्पाची निवड जिल्हास्तरासाठी झाली आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून समाजातील दुर्गम, डोंगराळ आणि दुष्काळग्रस्त भागातील पाणी वाहतुकीची समस्या सोडवण्यावर उपाय सुचवण्यात आला आहे. विशेषतः महिला आणि दिव्यांग व्यक्तींना पाणी वाहून नेण्यासाठी ही पद्धत अधिक सोयीस्कर आणि उपयुक्त ठरणार असल्याचे मानले जात आहे.
या यशाबद्दल स्थानिक स्कूल कमिटी, शालेय व्यवस्थापन समिती, पालक-शिक्षक संघ, माजी विद्यार्थी संघटना तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभागी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
मुख्याध्यापक मा. श्री. गावीत डी. सी. सर आणि सौ. निबाळकर मॅडम यांनीही प्रथम क्रमांक आणि जिल्हास्तरावर प्रकल्पाची निवड झाल्याबद्दल विद्यार्थ्यांचे आणि श्री. धुमाळ यांचे विशेष कौतुक केले.
विद्यालयाने या यशाला “शालेय नावीन्यतेची उत्तुंग भरारी” असे वर्णन करत सर्व सहभागी विद्यार्थ्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Good
Great
खुप छान
Gd