
एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक.
मुंबई :जवाहर बालभवन तर्फे दरवर्षी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते.यावर्षी वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात विद्यालयातल्या कु दुरवा यादव हिने प्रथम क्रमांक पटकावला.तसेच विद्यालयातील हरहुननरी शिक्षक श्री निवृत्ती प्रबळकर यांनी शिक्षक गट वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
श्री प्रबळकर सर यांची दिनांक ४ अॅाकटोबर रोजी संभाजीनगर येथे पार पडलेल्या आयडॅाल शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेसाठी अभिनंदनीय निवड झाली असून नामदार दादाजी भुसे (शिक्षण मंत्री) व पंकज भोयर(राज्यशिक्षणमंत्री )तसेच अनेक शिक्षण तज्ञांचया उपस्थितीत प्रबळकर सरांनी सादरीकरणाची संधी मिळाली .
स्कूल कमिटी,पालक व सर्व परिसरातील नागरिकांनी विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.
Very good
छान अभिनंदन…