
एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक
मुंबई : पहिल्याच प्रयत्नात यश मिळतेच असे नाही. अनेकदा अपयशाचा सामना करावा लागतो; मात्र अपयशाने खचून न जाता सातत्याने प्रयत्न केल्यास यशाची शिखरे निश्चितच गाठता येतात. अंधश्रद्धेचा त्याग करून वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारल्यास भारत विज्ञान व संशोधन क्षेत्रात निश्चितच अग्रस्थानी राहील, असे प्रतिपादन विविध मान्यवर वक्त्यांनी केले.
केपी (पूर्व) विज्ञान प्रदर्शन मेळाव्याच्या निमित्ताने अंधेरी येथील सेंट अरनॉल्ड हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जयराम यांच्या हस्ते झाले.
या वेळी विद्या प्राधिकरणाच्या मनीषा पवार, जवाहर बालभवनाच्या नीता पाटील, प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक टेरेन्स लुईस, मुंबई विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या माजी अधिष्ठाता अनुराधा मुजुमदार, पश्चिम विभागाच्या शिक्षण उपप्रमुख निशा वैदू, तसेच रेव्ह. फादर टॉमी थॉमस आदी मान्यवर उपस्थित होते.
‘आत्मनिर्भर व विकसित भारत’ या संकल्पनेवर आधारित STEM विज्ञान प्रदर्शन ही या मेळाव्याची मुख्य संकल्पना होती.
याअंतर्गत –
स्मार्ट मुंबई शहर
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित संकल्पना
ह्युमनॉईड रोबोट
थ्रीडी व इको-फ्रेंडली प्रिंटर
अशी विविध नावीन्यपूर्ण मॉडेल्स प्रदर्शनाची प्रमुख आकर्षणे ठरली.
या प्रदर्शनात एकूण २१० प्रकल्प विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी सादर केले. हे प्रदर्शन ज्ञान आणि मनोरंजनाचा संगम ठरले. विद्यार्थ्यांनी आपल्या विज्ञान शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मागील महिन्याभरापासून या प्रदर्शनाची तयारी केली होती.
हे विज्ञान प्रदर्शन यशस्वीपणे पार पडण्यासाठी शिक्षण निरीक्षक संजय जावीर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य समन्वयक मिनल सरकाळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
विज्ञान प्रदर्शन करणे म्हणजे मुलानच मनोबल वाढणे आणि विज्ञाना मध्ये रुचि निर्माण करणे एकदा कि पाठिवर शाबासकिची थाप पडली कि विज्ञानकार घडलाच समजा
प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात एक एव्हरेस्ट शिखर असतं किंभवून ते असायलाच हवं तसं असेल तर त्याचा ध्यास लागतो ते शिखर गाठायची ओढ विद्यार्थ्यांना अस्वस्त करते.त्यामुळे अशा कार्यक्रमाच्या आयोजनाने विद्यार्थी घडवायला मोलाची मदत होते एवढे मात्र नक्कीच…
Very good
Good