प्रतिनिधी:कांचन जांबोटी

मुंबई, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज, बुधवार दि.7 सप्टेंबर रोजी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आणि लालबागचा राजा गणेशोत्सवाला भेट देऊन श्रीगणपती बाप्पांचे दर्शन घेतले. राज्यातील शेतकऱ्यांना समृद्ध कर, राज्यातील सर्व नागरिकांना सुखी ठेव, महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा धावता ठेव, कृषी, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य अशा सर्व क्षेत्रातील देशातील सर्वात प्रगतशील, अव्वल राज्य हा महाराष्ट्राचा लौकिक कायम राहू दे, अशी प्रार्थना अजितदादांनी श्रीगणपती बाप्पांकडे यावेळी केली.