
प्रतिनिधी :मिलन शहा
अहमदाबाद विमान अपघातात बांसवाडा येथील एका सुखी कुटुंबाचा मृत्यू झाला. कुटुंबातील एकूण पाच सदस्य लंडनला जात होते.
डॉ. प्रतीक जोशी आणि डॉ. कामिनी जोशी हे पूर्वी उदयपूरमध्ये काम करत होते. डॉ. प्रतीक २०१६ मध्ये लंडनला स्थलांतरित झाले होते. एक महिन्यापूर्वी डॉ. कामिनी जोशी यांनीही उदयपूरच्या मेडिकल कॉलेजमधून राजीनामा दिला आणि आपल्या पतीसोबत लंडनला जाण्याचा निर्णय घेतला.
हे डॉक्टर दाम्पत्य त्यांच्या तीन मुलांसह, मुलगी मिराया जोशी, मुलगा नकुल आणि प्रद्युत जोशी यांना घेऊन अपघातग्रस्त विमानात लंडनला जात होते. नकुल आणि प्रद्युत हे जुळे भाऊ होते. अपघातानंतर बांसवाडा आणि उदयपूरमधील मेडिकल कॉलेजमधील दोन्ही कुटुंबांमध्ये शोककळा पसरली.
दुखद