
एसएमसमाचार – प्रतिनिधी -मिलन शहा
मुंबई : निवडणूक आयोगाकडून मतदारयाद्यांमध्ये होत असलेला घोळ आणि निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडावी, या मागणीसाठी १ नोव्हेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या ‘सत्याचा मोर्चा’च्या आयोजनाबाबत विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेतली.
या शिष्टमंडळामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, आमदार ॲड. अनिल परब, सचिव ॲड. साईनाथ दुर्गे;
महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, अरविंद गावडे;
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे जितेंद्र आव्हाड, राखी जाधव;
कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश रेड्डी आणि
शेतकरी कामगार पक्षाचे साम्या कोरडे
आदी मान्यवर उपस्थित होते.बैठकीदरम्यान मोर्चाच्या मार्ग, सुरक्षा व्यवस्था आणि शिस्तबद्ध आयोजनासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.
शिष्टमंडळाला यश लाभू दे
निवडणूक आयोग सरकारच्याच बाजूने असेल असा संशय व्यक्त होत असून यंदाही ” भाजप सरकार ” चं डोकं ठिकाणावर दिसत नाही.त्यामुळेच विरोधकांनी भेट घेतली असावी…
Democratic way