प्रतिनिधी :उत्कर्ष बोर्ले.
मुंबई :विलेपार्ले पूर्व येथील शहाजी राजे भोसले मार्गावरील भूता शाळेसमोरील रस्त्यातील मोठ्या गटाराचे झाकण निखळले आहे.
याबाबत के/पूर्व महापालिका संबंधित परिक्षण खाते सहाय्यक अभियंता यांना नागरिकांनी अनेकदा या बाबत तक्रार केली असून सुद्धा याकडे गांभीर्याने पाहीले जात नाही.तसेच या गटाराचे निखळल्याने त्या ठिकाणी प्लास्टिक चा बॅरिकेड तात्पुरता वाहन चालकांना लांबून सूचना मिळावी यासाठी लावण्यात आला आहे. मात्र या मुळे अति वर्दळीचा हा रस्ता अरुंद झाला असल्याने वाहतूक कोंडी आणि त्यामुळे होणारे वायू आणि ध्वनी प्रदूष्णात वाढ झाल्याचा ही त्रास परिसरातील रहिवाशांना होत आहे. मात्र पालिका दुर्लक्ष करत असल्याने स्थानिक हतबल झाले आहेत व त्यांनी संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती केली आहे की त्वरित या गटारावर नवीन झाकण बसवावे.
Bmc?