
प्रतिनिधी :उत्कर्ष बोर्ले
मुंबई : चामड्याशी संबंधित काम करणाऱ्या कक्कया समाजाचे भले व्हावे त्यांची प्रगती व विकास व्हावा. यासाठी संत कक्कय्या समाजाला आर्थिक विकास महामंडळ मिळावे यासाठी तसेच माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात सभागृहात दिलेल्या अश्वासनाची आठवण करुन देण्यासाठी संत कक्कया समाजाचे एक दिवसीय धरणे आंदोलन आझाद मैदान येथे आज ता. 7 जुलै रोजी करण्यात आले.
संत कक्कया आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे म्हणून वीरशैव कक्कय्या कल्याण मंडळ, मुंबई मार्फत मागील वर्षी 28 जून रोजी धरणे अंदोलन आयोजित केले होते. त्या अंदोलन साठी राज्यातील सर्व समाज बांधव, भगिनी, संस्था, महासंघ, संघटना असे सर्व घटक सहभागी झाले होते. त्यावेळी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात संत कक्कया समाजाला सुद्धा महामंडळ दिले जाईल असे जाहीर केले होते. परंतु एक वर्ष उलटून गेली तरी त्याची पूर्तता केली गेलेली नाही.
सर्व समाज बांधव यांची मागणी नुसार पुन्हा एकदा धरणे अंदोलन करण्यात यावे अशी जोरदार मागणी झाली. या सर्व सभासदाच्या मागणीचा विचार करता पुन्हा एकदा सरकारला जागे करण्यासाठी, संत कक्कय्या समाजाला आर्थिक विकास महामंडळ मिळवून देण्यासाठी वीरशैव कक्कया कल्याण मंडळ यांनी धरणे अंदोलन आयोजित केले गेले. आपल्या हक्काचे महामंडळ मिळवण्यासाठी संत कक्कया समाजातील बांधवानी पुन्हा एकदा आझाद मैदान येथे धरणे आंदोलनात मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.
यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी आंदोलनस्थळी येऊन संघटनेच्या मागणीला पाठिबा दर्शवला तसेच पुढेही साथ सोबत देण्याचे आश्वासन दिले. सध्याच्या सरकारच्या जेवणाचे आवताना म्हणजे लबाड लांडग्याच्या घरचे असते तेव्हा जपून राहावे अशी सरकारवर टीका केली. काँग्रेस पक्षाच्या खासदार व मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड, आमदार ज्योती गायकवाड, माजी खासदार राहुल शेवाळे, आर पी आय (आठवले) चे महाराष्ट्र सचिव गौतम सोनवणे यांनी आंदोलनात प्रत्यक्ष येऊन पाठिंबा दिला. मंडळाचे अध्यक्ष महादेव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांची भेट घेतली. यावेळी संघटनेचे सेक्रेटरी यशवंत नारायणकर, निवृत्ती सावळकर आदी उपस्थित होते. यावेळी मंत्र्यांनी पावसाळी अधिवेशन संपण्याच्या आधी निर्णय घेऊ असे आश्वासन दिल्याचे महादेव शिंदे यांनी सांगितले.सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे, महासंघाचे राम कोकणे उपस्थित होते