
एसएमएस -प्रतिनिधी.
मुंबई :मालाड पश्चिमेतील मालवणी म्हाडा गेट क्रमांक ८ परिसरातील ब्रह्मा बिल्डिंगच्या मागील भागात वृक्ष तोडीच्या वादातून धमकी चा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित व्यक्तीने सोसायटीचे सचिव इर्शाद खान जे पेशाने प्रोड्युसर आहेत त्यांनी वृक्ष तोडीस विरोध केल्यावर त्यांना कोयता दाखवून कथित धमकी दिल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ब्रह्मा बिल्डिंगच्या मागील बाजूस काही व्यक्ती झाड तोडत असताना सोसायटीच्या सचिव इर्शाद खान ने विरोध केला. यावर संतप्त झालेल्या एका व्यक्तीने थेट कोयता दाखवत धमकी दिली. काही वेळातच तो आपल्या इतर साथीदारांसह बिल्डिंगच्या आवारात घुसून सोसायटीतील रहिवाशांना धमकावू लागल्याचा आरोप केला आहे.
या घटनेमुळे रहिवाशांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानिकांनी या प्रकरणात तातडीने पोलिसांनी हस्तक्षेप करून संबंधित वृक्ष तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, अनधिकृत झाडतोडीचा मुद्दाही गंभीर असून, संबंधितांवर पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन केल्याबद्दलही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तक्रार दार हे ब्रह्मा गृहनिर्माण सोसायटी चे सचिव आणि बॉलीवूड चे निर्माता निर्देशक आहेत त्यांनी अनेक कॉमेडी चित्रपट निर्माण केले आहेत.
मी या घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालवणी पोलीस ठाणे यांना मोबाईल वर दिली व त्यांनी कारवाई चे आश्वासन दिले दरम्यान तो कोयता धारी व त्याचे कही साथीदार आमच्या इमारतीच्या परिसरात घुसले व आम्हाला बघून घेण्याची धमकी दिल्याचे चित्रीकरण सिसिटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. माझी पोलिसांना तसेच वन विभागाला विनंती आहे की त्यांनी या कडे गंभीरतेने लक्ष द्यावे -इर्शाद खान -सचिव ब्रह्मा गृहनिर्माण सोसायटी.
Law and order ??