प्रतिनिधी :मिलन शहा
मुंबई: शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट नेहमी माध्यमात चर्चेचा विषय असतात. यंदा आमदार निवासतील कॅन्टीन मध्ये शीळ अन्न हे कारण झाले. ते येवळे संतापले की कॅन्टीन चालकाला त्यांनी मारहाण केली त्याचा ही व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
एक आमदार ते ही प्रगत पुरोगामी मागराष्ट्रातला असं बरं का वागतोय? याचे मुख्य कारण काय असणार? मंत्रिपद नाही मिळाल्याची चिढ की काय? जर जेवण निकृष्ट व शीळ होत तर त्याची रीतसर तक्रार करून कॅन्टीन चालकावर कारवाई करायला हवी होती व तसं करने योग्य ही होते मात्र यांना तसं करने जमत नाही की स्वत आमदार असून ही व्यवस्थेवर विश्वास नाही? म्हणून की काय स्वताच कायदा हातात घेतला? जर त्यांना स्वत आमदार असल्याचे भाण नसेल किंवा विसर पडला असेल तर मग त्यांना प्रशिक्षणाची गरज आहे किंवा ते तणावात असतील तर त्यांना मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांची काउंसेल्लिंग करावी अन्यथा यांच्या सारखे जर सामान्य मतदार यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरु केले तर काय होईल??