
प्रतिनिधी :मिलन शहा
नवी दिल्ली :शंभू सीमेवर आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यात आले आहे.हरियाणा-पंजाब शंभू सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना आंदोलक शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स हटवले.हरियाणा-पंजाब शंभू सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला.शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी देशाची राजधानी दिल्लीकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.