
File photo
प्रतिनिधी :केशटो मुखर्जी
एक कलाकार 1960 दशका पासून,फिल्मी पडद्यावर,फक्त दारू प्यायल्याचा नाद करून बेवड्याची अदाकारी पेश करायचा.एक अस्सल दारुडा वाटायचा.त्याचे हावभाव,डोक्याला असणारे टक्कल, दोन्ही डोळ्यांची चकण्यासरखी भीर भरती नजर साकारण्याची अदभुत कलाच,ह्या कलाकाराच्या अंगी होती.कारण साधा व दारू प्यायलेला माणूस आणि त्याचे बोल, ह्यात जो जमीन आसमनचा फरक आहे,तो ह्या नटाने सिनेमात आणला.त्याकाळी कोलकाता येथून,मुंबईची चंदेरी फिल्मी दुनिया त्याला येथे घेऊन आली. सुरुवातीच्या काळात या कलाकाराने बऱ्याच हाल अपेस्ट्या सोसल्या. रेल्वेच्या इमारतीमध्ये एका छोट्याशा खोलीत राहायचा.ज्या ठिकाणी उंदरांचे राज्य होते.तेथे तो राहिला आणि त्याच्या शेजारी नेहमी एक कुत्रा असायचा.त्यांचे मित्र स्वर्गीय,असित सेन, हे सुद्धा एक हास्य कलाकार त्यावेळेस भारतीय चित्रपट सृष्टीत होते. त्यांची विशिष्ट बोलायचे शैली होती,ती प्रेक्षकांना भावायची. त्यांनीच या दारुड्या व्यक्तीला हिंदी व बंगाली चित्रपट आणले. ते नटवर अर्थात स्वर्गीय, केशटो मुखर्जी. त्यांचा जन्म ब्रिटिश कलकत्ता प्रांतात 1925 ला झाला.ते एक विनोदी हास्य कलाकार होते.शुद्ध बेवडा म्हणून त्यांना लोक पडद्यावर संबोधायचे. पण सांगायचे खरी गोष्ट म्हणजे,ते स्वतः निर्व्यसनी होते.त्यांनी कधी दारूला शिवले ही नव्हते, पण दारुड्याची कला पेश करणे हा त्यांचा हातखंडा होता.तुम्हीच कल्पना करा की! हा माणूस कधीच दारू प्यायला नाही मग एवढ्या मोठ्या पडद्यावर बेवड्याचे हे शिव धनुष्य, त्यांनी सहज पेलले. म्हणून त्यांच्यावर दारुड्याची छाप पाडली,ती कायमचीच.
अनेक चित्रपटांना त्यांच्या या भूमिकेने न्याय दिला. मुख्य कलाकारां बरोबर, त्यांनी छान सहकार्य केले व आपले नाव कमावले. 1981 ला आपल्या दिलेल्या एका मुलाखातीत मी दारू प्यायचं कारण,मुंबईत कामासाठी आलो असता,मला मला मन शांती मिळावी,म्हणून मी दारू प्यायलो आणि ह्या दारू मुळेच, मी बेवडा म्हणून प्रसिद्ध झालो.असे त्यांनी नमूद केलेले आहे.हे कितपत सत्य आहे ते त्यांनाच माहिती. परंतु दारू प्यायल्याची नक्कल करणारा, त्यांचा सारखा, दुसरा हास्य कलाकार अजून तरी झालेला नाही. त्यांना ही एक निसर्गाने दिलेली देणगी होती. ते फक्त आपल्या लग्नाच्या दिवशी दारू प्यायले नव्हते! असं त्यांनी नमूद केलेले आहे.हे अर्धसत्य आहे. असो! 1952 ला “नागरिक” या चित्रपटात त्यांनी आपल फिल्मी जीवन सुरू केलं.त्यांच्या काही खास भूमिका असलेले चित्रपट,पुढील प्रमाणे आहेत जे अजूनही आठवणीत आहेत. 1968 पडोसन, 1972बॉम्बे टू गोवा,पिया का घर,1973परिचय, जंजीर,1975 शोले,1979गोलमाल. जुर्माना, 1981खुशबू. हे चित्रपट लोकांच्या अजूनही लक्षात आहेत, हे विशेष.अनेक अंगणीत अशा चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या.एकंदरीत 300 हून अधिक चित्रपटांत कामे केली. ह्या फिल्मी जगताचा अनुभव त्यांचा फारच मोठा आहे. आपल्या कामावर निष्ठा व चिकाटी तसेच दिलेले काम व्यवस्थित करणे ह्यात त्यांची सचोटी होती. त्यांचे सगळ्यांन बरोबर या फिल्मी दुनियेत संबंध चांगले होते. त्यांनी जवळ जवळ 60 वर्षे जन माणसांची या माध्यमाद्वारे सेवा केलेली आहे.ह्या त्यांच्या भरीव कामगिरीला, मानाचा मुजरा!