
प्रतिनिधी : वैशाली महाडिक
मालाड, ता. १४(बातमीदार )रयत शिक्षण संस्थेचे ज्ञानवर्धिनी विद्यालय चारकोप कांदिवली शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका शशिकला किरण जाधव या करीत असलेल्या सामाजिक कार्याची ज्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत आणि जादूटोणाविरोधी कायद्याबाबत करीत असलेले सामाजिक कार्य, मराठी भाषा वृद्धिंगत करण्याबाबत करीत असलेले कार्य, कॅन्सर रुग्णांकरिता करीत असलेल्या कार्याबाबत, देहदान आणि अवयवदान बाबत करीत असलेले जनजागृती कार्य, विद्यार्थ्यांमध्ये लैंगिक शिक्षण आणि व्यसनमुक्तीबाबत करीत असलेले कार्य, योगाभ्यास क्षेत्रात करीत असलेले कार्य, समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याबाबत करीत असलेले कार्य इत्यादी कार्याची दखल घेऊन “अर्धांगिनी एक पूर्णत्व” या सामाजिक संस्थेमार्फत ‘ सन्मान तिच्या कर्तुत्वाचा’ म्हणून गौरव करण्यात आला सोमवारी ११ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी मंदिर नाट्यगृहात सत्कार सोहळा पार पडला व शशिकला किरण जाधव सह राज्यस्तरीय वेग वेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिला यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.. सर्व विजेते,आयोजक यांना शुभेच्छा दिल्या त्यांचे स्वागत करताना आम्ही स्वावलंबी प्रतिष्ठान अध्यक्ष व माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष घनश्याम देटके व विनोद साडविलकर(रुग्ण मित्र तथा सामाजिक कार्यकर्ता) जाधव मॅडम वरती सुंदर असे
कविता लेखन आम्ही स्वावलंबी प्रतिष्ठान च्या सल्लागार परिणीता माविनकुर्वे यांनी केले आहे.
Congrats मॅडम
Abhinandan