शासनाच्या दुर्लक्षामुळे मच्छिमाराची नौका उध्वस्त? कोळी बांधव.

Share

विशेष प्रतिनिधी.

मुंबई,मढ कोळीवाडा, मधलापाडा, मालाड पश्चिम, मुंबई येथील राहणारे श्री आकाश भालचंद्र कोळी यांची मासेमारी नौका नामे श्री लक्ष्मीनारायण नोंदणी क्रमांक IND-MH-02- MM 6223 दि.13 सप्टेंबर 2023 बुधवार रोजी रात्री अंदाजे 9.45 च्या सुमारास मढ तलपशा बंदरातून सदर नौका बाहेर पडली व मासेमारी करीता प्रथमच समुद्रात प्रस्थान केले. सदरची अमावास्याची रात्र होती, घनघोर काळोख पडला होता, नौकेचा चालकाला सदर अंधारात मढ बेटाच्या पश्चिमेला दोन किलामिटर समुद्रात असलेल्या काश्या खडकाचा अंदाज चुकला, काळ्या अंधारात काळा खडक समजला नाही. व नौका सदर काश्या खडकाला जाउन धडकली. सदर धडकेमध्ये नौकेचा पुढील भाग क्षतीग्रस्त झाला. नौकेत मोठ्या पाणी शिरायला लागले, नौकेतील खलाशी घाबरून गेले. नौकेला वाचविण्याकरीता त्यांनी नौकेची दिशा मढ कोळीवाडा पश्चिम किना-यावर पोहचविण्याचा प्रयत्न केला, परंतू नौकेची टायटॅनिक जहाजाप्रमाणे मोठी हानी झाल्याने, नौकेत मोठ्या प्रमाणात समुद्राचे पाणी शिरले. काही अंतरावर जाउन नौका पाण्याखाली बुडायला लागली. इंजिनमध्ये पाणी गेल्याने इंजिन बंद पडले, नौकेतील सात खलाशांनी नौकेतील बोये बांधण्यास सुरुवात केली. नौकेवर सुरू असलेली रोशनाई हळू हळू काळया अंधारात लुप्त झाली, नौकेवरील खलाशी लाईफ जॅकेटचा आधार घेउन समुद्राशी झुंज देत पोहत होते. मढ किनारी बसलेले काही मच्छिमार बांधव हा सर्व प्रकार पाहिला. मच्छिमारांना सदर घटना समजली. श्री अक्षय कोळी यांचा मदतीची हाक देणारा मॅसेज श्री संतोष कोळी यांच्याकडे पोहचला तो श्री संतोष कोळी यांनी गावात पसरला. मढ गावातील मच्छिमार बांधवांनी त्वरीत आपल्या काही नौका काढल्या व गावातील अशा घटनावेळी धातून येणारे श्री भास्कर घारे यांच्या मार्गदर्शनात असंख्य मच्छिमार बांधव घटनास्थली पोहचले, व पोहत असलेल्या सर्व सात खलाशांना नौकेत उचलून त्यांचा जीव वाचविला. थोड्याच वेळात संपुर्ण गांव मढ किनारी जमा झाले. तरूण वर्ग छोट्या छोटया नौका घेउन मदत कार्याला सरसावले. खुप परिश्रम करून सुद्धा रात्रीचे २ वाजेपर्यत मच्छिमारांनी सदर नौकेला दोरखंड बांधून खेचून आणण्याचा प्रयत्न केला, परंतू अपयशी ठरले. ह्या दरम्यांन श्री संतोष कोळी व श्री धनाजी कोळी यांनी मत्स्यव्यवसाय विभाग, पोलिस विभाग, कोस्ट गार्ड विभाग व सागरी पोलिस यांना सदर घटनेची माहिती मॅसेज करून दिली. रात्री 1 वाजता बचाव कार्य थाबविण्यात आले. कारण रात्रीच्या वेळेस काही करता येत नव्हते. सर्व नौका मढ तलपशा किनारी आल्या. नौकेतील खलाशी खुप घाबरलेले होते. पोलिस अधिका-यांनी त्यांची नावे घेतली व घटनेची चौकशी केली. बचाव कार्यामध्ये सामिल मच्छिमारांनी सदर नौका बचाव कार्य पुन्हा पहाटे 5 वाजता सुरू करण्याचे योजीले व नौका तरंगविण्याकरीता बोये, ड्रम, मोठे दोरखंड उपलब्ध करण्यास तरूणांना सुचित केले. रात्रभर तरूणांनी मेहनत घेउन सर्व साहित्य जमा करून घेतले. व पहाटे घटनास्थळी पोहचले. ओहटी झाल्याने काही प्रमाणात त्यांना दोरखंड बांधता आले. व नंतर सदर नौका टोचन करून आठ मोठ्या नौकांनी खेचण्यास सुरुवात केली. 10 लहान नौकां त्यांना सहकार्य करीत होत्या. शेकडो मच्छिमार बांधव बचाव कार्यामध्ये लागले होते. मढ किनारी मढ दर्यादिप मच्छिमार संस्थेत संतोष कोळी व धनाजी कोळी हे सर्व अधिका-यांच्या संपर्कात लागले होतो. सागरी पोलिस अधिकारी सुद्धा आले होते. मत्स्यविभागाच्या परवाना अधिकारी सुद्धा आल्या होत्या, शाशनामार्फत नौका समुद्रातून बाहेर काढण्यासाठी मदत व्हावी ह्याकरीता प्रयत्न करीत होते. तसेच गावातील इतर कार्यकर्ते सुद्धा सदर बाबती आप आपल्या परिने धावपल करीत होते. पुढे पाण्याखाली जाउन आणखीन नौकेला दोरखंड बांधण्याची आवश्यक्ता होती. सर्व अधिकारी व विभागांना अंडर वॉटर ड्रायव्हिंग करणे करीता आवश्यक साधने कुठून उपलब्ध होतील ह्याची धडपड सुरू होती, भाटी गावचे धाडसी सुपुत्र चंदन लक्ष्मण कोळी हे पाण्याखाली जाउन दोरखंड बांधण्यास सज्ज होते. स्कुबा ड्रायव्हिंगचे साहित्य नसल्याने निराश होते. ते मिळविण्यासाठी श्री नविन कोळी, सत्यम कोळी असे तरूण सुद्धा धावपल करित होते. शेवटी संतोष कोळी व धनाजी कोळी यांचा संपर्क एक्स नेव्ही अधिकारी मारीओ यांच्याशी झाला त्यांनी विकास व प्रतिक यांच्याशी संपर्क झाला व त्यांना मढ येथे सर्व साहित्यांसहित येण्याची विनंती केली. ते विरार येथून साहित्य घेउन निघाले, त्या दरम्यान सागरी पोलिस २ चे वरिष्ठ पोलिस निरिक्षक श्री पोखरकर साहेब यांनी देशमुख साहेबांशी संपर्क करून एक ठग नौका टोचन करण्यासाठी मागविली सदर ठग नौकेनेसुद्धा खेचण्याचा खुप प्रयत्न केला, नौकेला बांधलेले दोरखंड तुटत होते. म्हणून स्कुबा ड्रायवर मार्फत समुद्रात पाण्याखाली जाउन नौकेला दोर बांधणे जरूरी होते. स्कुबा ड्रायवर यांना मढ येथे पोहचण्यास उशिर झाला. पुन्हा रात्र पडली. म्हणून नौका बचाव कार्य थांबविण्यात आले, पुन्हा दि 15 सप्टेंबर 2023 रोजी पहाटे 4वाजता नौका बचाव कार्य सुरू करण्यात येणार आहे.

दरम्यान शासनाला संतोष कोळी, अध्यक्ष मढ दर्यादिप मच्छिमार सहकारी संस्थेने दिनांक 28 एप्रिल 2022 रोजी सदर काश्या खडकावर दिपस्तंब बांधून देण्याची मत्स्यव्यवसाय विभागाकडे मागणी केली होती. व अश्या घटना मागे झाल्या आहेत. भविष्यात सुद्धा होणारच म्हणून लवकरात लवकर येथे दिपस्तंभ बांधून मिळावा म्हणून विनंती अर्ज केला होता. परंतू शासनाने दुर्लक्ष केले. शेवटी आकाश भालचंद्र कोळी ह्या मच्छिमार बांधवावर एवढे मोठे संकट आले. ह्याला जबाबदार कोण, जर का शासनाने सदर काश्या खडकावर दिपस्तंभ बांधला असता तर हि घटणा घडली नसती. व एका मच्छिमार बांधवाचा व्यवसाय उध्वस्त झाला नसता. तसेच हि घटना झाल्यानंतर सदर नौका बाहेर काढण्यासाठी जे मदत कार्य शासनातर्फे व्हायला पाहिजे ते होत नाही, अशी व्यथा श्री संतोष कोळी यांनी व्यक्त केली, पुढे ह्या सर्व अपघातांबाबत शासनाने थोडीशी जागरूक्ता दाखवून मच्छिमारांना अशा घटनांच्या वेळी आवश्यक मदती बाबत चर्चा करून योग्य धोरण ठरवावे. कारण आज मच्छिमारांच्या 8 मोठ्या नौका व 7 छोट्या नौका दोन दिवसांपासून मदत कार्यात डिझेल संपवत आहेत. सदर कार्यात डिझेल उपलब्ध करून देण्याचे काम शासनामार्फत झाले पाहिजे, टोचन करण्यासाठी मोठ्या ठग नौकेची व्यवस्था शासनामार्फत झाली पाहिजे, बुडालेल्या नौकेला पाण्याखाली जाउन दोरखंड व्यवस्थित बांधण्यासाठी स्कुबा ड्रायवर व त्याचे साहित्य शासनाने उपलब्ध करून दिले पाहिजे, सदर नौका टोचन करून खेचत आणण्यासाठी समुद्रातील इतर मच्छिमार बांधवांचे सजांचे नुकसान होत आहे. त्यांना सहाय्य शासनाने केले पाहिजे, अशा मदतिची अपेक्षा मच्छिमारांची शासनाकडे आहे ती पुर्ण केली पाहिजे असे मत संतोष कोळी अध्यक्ष मढ दर्यादिप मच्छिमार सहकारी संस्था यांनी व्यक्त केले


Share

One thought on “शासनाच्या दुर्लक्षामुळे मच्छिमाराची नौका उध्वस्त? कोळी बांधव.

  1. This unfortunate accident could have been avoided if the authorities had taken necessary precautionary measures.
    At least now they should take steps to ensure that no such accidents recur in future.
    Immediate steps should also be taken to bring back the capsized boat to the shore and adequate compensation is paid to the victims.

    A. C Sreedharan, Secretary, CPI(Marxist), Malvani.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *