
प्रतिनिधी :मिलन शहा
मुंबई,आरक्षणाचे जनक,समाजातील अनिष्ट रूढी, अस्पृश्यतेविरोधात लढणारे थोर समाजसुधारक, सामाजिक न्यायाचे प्रणेते, लोककल्याणकारी राजे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी सकल मातंग समाजाच्या वतीने आज मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्याचे निवेदन जिल्हा अधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांना देण्यात आले.
यावेळी सकल मातंग समाज राज्य समन्वयक सुरेशचंद्र राजहंस, बाबुराव मुखेडकर , प्रकाश बाबर , फकिरा उकांडे, लीनाताई सुतार, सुरेश साळवे, विठल गडीकर, श्रीकांत शिंदे, ॲड शिंदे व इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
आज सकल मातंग समाजाच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात अशा प्रकारे निवेदन देवून शिंदे फडणवीस सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे अशी माहिती सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली.