
प्रतिनिधी :सुरेश बोरले
मुंबई,शिंदे सरकार सत्तेमध्ये येण्याकरिता, त्यामधील लोकांनी पक्षपातीपणा केला असेल किंवा अजून काय केलं असेल,पण ते सत्तेवर आले हे महत्त्वाचे आहे.आपण सत्तेवर आल्यावर आपण समाजाचे झालेलो आहोत, याचे भान शिंदे सकारातील शिलेदारांना राहिलेलं नाही. ज्या पक्षातून त्यांनी पक्षांतर केले तेव्हाच त्यांचा संबंध त्या पक्षासाठी संपलेल आहे.
हे ते विसरलेले आहेत. कारण त्या मुख्य पक्षाचे किंवा त्यांच्यासोबत असणाऱ्या आघाडी सरकारने सभा घेतली की, हे त्या ठिकाणी हे सभा घेतात, आपले शक्ती प्रदर्शन दाखवण्यासाठी, त्वरित मोठे मैदान घेतात,हजारोंच्या संख्येने खुर्च्यांची सजावट करतात. त्यांनी मोर्चा काढला की, त्या ठिकाणी हे मोर्चे काढणार , नाहीतर कोणत्याही वायफळ राजकारणाचा विषय असल्यास, त्यांना शिंदे सरकार प्रतिउत्तर देणार. अरे हे काय चाललंय? आता तर तुम्ही सत्ते मध्ये आहात,मग वायफळ खर्च व गोष्टी कशासाठी? शेवटी याची आर्थिक झळ कोणाल फेडावी लागणार? असो, हो! ते विरोधक आहेत. ते विरुद्ध बोलणारच, आणि विरोध हा असलाच पाहिजे नाही तर एक कलमी कार्यक्रम व्हायचा. पण त्यासाठी आपलं महत्त्वाचं एकमेकांचे पाठबळ महत्वाची शक्ती वाया घालवणं कितपत योग्य आहे? ही शक्ती आपण आपल्या जनतेच्या कल्याणासाठी वापरवी, असे आम जनतेला वाटते. आर्थिक,मानसिक, नाहक जनतेची हेडसांड का? तुमच्या भांडणात जनतेला वेठीस धरणे योग्य आहे का? तुम्ही का पक्षांतर केलं त्याची तुम्हाला भीती वाटते का?की!कदाचित हे सगळं जनतेच्या विरुद्ध होतं का किंवा आपण परत निवडून येऊ की नाही? किंवा आपला दारुण पराभव होईल का? ह्या चिंता तुम्हाला सतावत आहेत का? कारण यावर जनहितच आपल्याला न्याय देणार आहे. आपला पक्षांतर योग्य की अयोग्य हा जनतेच्या मानसिकतेचा भाग आहे.आपली पक्षांतर कृती आपणास योग्य वाटत नसले तर आपण सामाजिक कामे करून जनतेचे मने जिंका! आणि पहा चमत्कार! अशा प्रकारे विरोधाला विरोध करून गदारोळ माजवून लोकांची दिशाभूल करण्यात काही अर्थ आहे का? जुन्या सरकारची अधोरे लीखित कामे रद्द करायची, जी कामे पास करताना आपण त्या सरकारमध्ये आपण होतात.ती कामे नव्याने सुरुवात करून मग आपण भाव खायचा? हे योग्य आहे का? वरील गोष्टी या आपण सर्वस्वी जनता जनार्दनावर सोडा. कारण जनहितच आपल्याला न्याय देणार आहे.आपला पक्षांतर योग्य की अयोग्य हे जनतेचा
मानसिकतेचा भाग आहे. आपली पक्षांतर कृती आपणास अयोग्य वाटत असेल तर आपण समाजाची कामे व्यवस्थित करा वेळेत करा,मग जनतेचे मनोगत पहा! मग चमत्कार पहा.सध्या विरोधाला विरोध करून गदारोळ घालून, लोकांची दिशाभूल, करण्यात काय अर्थ नाही. याची आपण नोंद घ्या. जुन्या सरकारने केंद्रित केलेली कामे रद्द करायची व ती नव्याने सुरु करून क्रेडिट आपण घ्यायचे यात काही अर्थ नाही. कारण या कामांची आर्थिक झळ ही जनतेलाच असणार आहे. हे सर्वश्रुत आहे. ह्या अशा वायफळ गोष्टी करताना आपण आपला मिळणारा मासिक तनखा व निवृत्तीवेतन याचे फायदे आपल्याला मिळणार आहेत, त्यामुळे जनता गेली भाड मध्ये अशी आपली कल्पना आहे का? जनतेच आम्हाला काहीच पडलेल नाही. अशा या धामधुमीत कुठेतरी काहीतरी उद्घाघाटने करायची, जनतेला दाखवायचे आम्ही तुम्हाला विसरलो नाही पण जनता सज्ञान आहे.हे सगळे जाणते. आपले शक्ती व आर्थिक उन्नती वायफळ उधळण्यापेक्षा ती जनतेच्या हितासाठी, कशी वापरता येईल याचा विचार शिंदे शाहीने करावा. कारण सत्ताही सहजा सहजी मिळणारी वस्तू नाही. त्यासाठी काय!काय! करावं लागतं ते आपण केलेल आहे. काहीही केल असेल ती तुमची कुशलता आहे.पण ती टिकवणे की वायफळ घालवणे हे तुमच्या हातात आहे.आता विरोधाला विरोध करण बस करा, त्यांना त्यांची भूमिका मांडू द्या. ते त्यांचा काम आहे. त्यांना सामाजिक कामाने उत्तर द्या. जेणेकरून विरोधकांच्या विरोध हा मावळेल व त्यांना योग्य उत्तरे कामाच्या रूपात मिळतील. कारण संधी एकदाच मिळते ती पुन्हा पुन्हा मिळत नाही. त्या संधीच सोनं करायच की, राख करायची हे तुमच्या हातात आहे. त्यासाठीही नामी संधी आलेली आहे, हे विसरू नका.