
प्रतिनिधी : मिलन शहा
मुंबई : अभिषेक शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सुनिताई नागरे यांच्याकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दातली शाळेतील गरजवंत विद्यार्थ्यांना स्कूल बॅग देण्यात आल्या तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ (बिस्किट, शेंगदाणा चिक्की, वेफर्स) वाटप करण्यात आला.त्याचप्रमाणे शिक्षकदिन साजरा करून शिक्षकांमुळेच आपल्या सारखे विद्यार्थी घडत असतात या अनुषंगाने शाळेतील लताबाई धनाजी अहिरे, धारासिंग महादू राठोड अमृत बारकू नांद्रे,पोपट विक्रम नागरगोजे, जया बापू गिरी शिक्षकांचे पुष्पगुच्छ आणि लेखणी देऊन सन्मान केला कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय सुनिताताई नागरे, सुरज विश्वकर्मा, मधु कुमार राठी ,राध्येश्याम गुप्ता ,सन्माननीय माजी सरपंच लहानूभाऊ भाबड, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष शरद भाऊ आव्हाड, सदस्य गुरुदेव भाऊ भाबड, शिक्षण प्रेमी सचिन भाऊ आव्हाड, कुंदेवाडी शाळेचे मुख्याध्यापक भुजबळ सर, सय्यद सर, दातली शाळेचे शिक्षक उपस्थित होते
सुनिताताई नागरे त्यांच्या संस्थेच्या वतीने दरवर्षी आपल्या दातली शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करत असतात तसेच शाळेला भौतिक सुविधा साठी साहित्याची मदती करत असतात, आपल्या दातली शाळा विषयी त्यांना कायमच आपुलकी व प्रेम आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहू नये त्यांना गुणवत्तपूर्ण शिक्षण मिळावे ही त्यांची कायम तळमळ असते.शाळेच्या वतीने सन्माननीय मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.सुनिताताई नागरे, अभिषेक शैक्षणिक व सामाजिक संस्था यांची शाळा खूप खूप आभारी आहे.
स्तुत्य कार्य