
एसएमएस – प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले.
शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त गुरुवार, 19 फेब्रुवारी ते रविवार, 22 फेब्रुवारी दरम्यान संस्थेच्या मैदानात व सभागृहात भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.या प्रदर्शनात युनिसको ने जागतिक वारसा म्हणून घोषित केलेल्या १२ ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती सादर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये विशेषत्वाने समावेश असलेले किल्ले असे —रायगड किल्ला,राजगड किल्ला, प्रतापगड किल्ला,सिंहगड किल्ला,पन्हाळा किल्ला, शिवनेरी किल्ला, लोहगड किल्ला,साल्हेर किल्ला,सिंधुदुर्ग किल्ला,विजयदुर्ग किल्ला,तोरणा किल्ला आणिसुवर्णदुर्ग किल्ला.यासोबतच शिवकालीन शस्त्रास्त्रे, नाणी आणि ऐतिहासिक वस्तूंचेही आकर्षक प्रदर्शन मांडण्यात आले आहे. इतिहासप्रेमी, विद्यार्थी आणि शिवभक्तांसाठी हे प्रदर्शन विशेष पर्वणी ठरणार आहे.हे प्रदर्शन सर्वांसाठी निःशुल्क खुले असून शिवप्रेमी आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष ग. स. पांडलोसकर यांनी केले आहे.
यासोबतच शिवकालीन शस्त्रास्त्रे, नाणी आणि ऐतिहासिक वस्तूंचेही आकर्षक प्रदर्शन मांडण्यात आले आहे. इतिहासप्रेमी, विद्यार्थी आणि शिवभक्तांसाठी हे प्रदर्शन विशेष पर्वणी ठरणार आहे.
हे प्रदर्शन सर्वांसाठी निःशुल्क खुले असून शिवप्रेमी आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष ग.स.पांडलोसकर यांनी केले आहे.
वाह छान