शिवाजी पार्कातील “माई मंगेशकर” बालो उद्यान दुरवस्थेत…

Share


प्रतिनिधी:सुरेश बोर्ले

मुंबई :दादर शिवाजी पार्कला लागूनच बालकांसाठी,स्व. माई मंगेशकर ह्यांच्या नावे एक बालोद्यान आहे.रोज संध्याकाळी आसपास परिसरातील लोक येथे आपल्या लहान मुल व बालकांना घेऊन येत असतात.अनेक उपलब्ध खेळाची साधने असल्याने,मुलांचे मनोरंजनही होते.येथे अनेक प्रकारच्या घसरगुंड्या,फिरते पाळणे,चक्र, रोषणाई फुल पाखरू अशी व्यवस्था आहे.पण ह्या साधनांवरन मुले पडून जख्मी होऊ नये म्हणून पालिकेने कृत्रिम रबरी मॅट अर्थात चटई जमिनीवर घट्ट चिकटवलेली आहे.ही चटई आता उन्हा पावसाने बऱ्याच ठिकाणी उखडून गेलेली आहे.त्यामुळे साधनांच्या आसपास आता मोठे खड्डे निर्माण होऊन, त्या खालची जमीन आता दिसत आहे.लहान मुले येथे धावताना पडून जख्मी होत आहेत.याची नोंद येथील पालिका कर्मचारी, वॉर्ड अधिकारी,उद्यान विभागातील अधिकारी,तसेच स्थानिक नगरसेवक ह्यांनी घ्यायला हवी! सदर चटई ही नवीन सर्वोत्तम प्रकारची चटई चिकटवावी. जेणेकरून लहान बालकांना खेळताना व धावताना कोणताही अडथळा येऊ नये.


Share

One thought on “शिवाजी पार्कातील “माई मंगेशकर” बालो उद्यान दुरवस्थेत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *