शेतकऱ्याच्या मदतीला धावले उबाठा आमदार मिलिंद नार्वेकर!!

Share

प्रतिनिधी :मिलन शहा

अवकाळी पावसाने महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पीकाचा डोळ्यादेखत चिखल झाला आहे. बीड जिल्ह्यातील दरेकर कुटुंबाला सुद्धा अस्मानी संकटाचा जबर तडाखा बसला. या तडाख्यात त्यांचा तीन एकरवर लावलेला कांदयाचे पीक वाहून गेला. शेतकरी महेश बापू दरेकर, त्यांची पत्नी सोनम दरेकर आणि त्यांच्या लहान चिमुकलीचा पावसामुळे झालेल्या चिखलातून कांदा वेचतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने संपूर्ण महाराष्ट्राने तसेच देशाने पाहिला. पिकवलेला सर्व कांदा सडून गेला, आता “मी आता शाळेत कशी जाऊ? असा सवाल चिमुकलीने सरकारला केला होता. तसेच दरेकर कुटुंबाने सरकार दरबारी मदतीची हाक मारली होती. या बाबत माहिती मिळताच त्या मुलीच्या मदतीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विधान परिषद आमदार मिलिंद नार्वेकर हे धावून गेले आणि त्यांनी दरेकर कुटुंबाला एक लाख रुपयांची आर्थिक त्वरित मदत केली आहे.


Share

12 thoughts on “शेतकऱ्याच्या मदतीला धावले उबाठा आमदार मिलिंद नार्वेकर!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *