
मुंबई : संघामित्रा महिला मंडळ, येळवण (ग्रामीण) यांच्या माजी अध्यक्षा शेवंतीबाई जयराम जाधव यांचे वयाच्या ८०व्या वर्षी नालासोपारा (प.) येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, दोन सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
संघामित्रा महिला मंडळ, मुंबईच्या अध्यक्षा प्रियंका प्रदीप जाधव यांच्या त्या सासूबाई होत. स्मृतिशेष शेवंतीबाई जाधव शांत, मनमिळावू आणि समाजप्रिय स्वभावाच्या म्हणून ओळखल्या जात. त्यांचे मूळ गाव राजापूर तालुक्यातील मौजे येळवण असून, सध्या त्या नालासोपारा (प.) येथे वास्तव्यास होत्या.
त्यांचा जलदान विधी व पुण्यानुमोदन कार्यक्रम रविवार, दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी नालासोपारा येथील त्यांच्या राहत्या घरी होणार असल्याचे बौद्ध प. समिती शाखा क्र. ७७२ व येळवण बौद्धजन विकास मंडळ यांनी कळविले आहे.
Rest in peace mam.
भावपूर्ण श्रद्धांजलि.
ओम शांति ओम
आदरांजली
Rip