
प्रतिनिधी : उत्कर्ष बोर्ले
मुंबई : जोगेश्वरी पूर्व येथील श्री समर्थ माध्यमिक आणि श्रीमती लक्ष्मीबाई वळंजू प्राथमिक शाळेतील जवळपास १४० गोर गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना रॉबिनहुड आर्मी आणि हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीच्या माध्यमातून किराणा किट संत नामदेव महाराज यांच्या ६७५ व्या संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधून वितरीत करण्यात आले. यावेळी समर्थ संस्थेचे उपाध्यक्ष दिनकर तावडे, सचिव सुनील नलावडे, कार्यकारिणी सभासद गणेश हिरवे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या शाळेत येणारी मुलं ही आरे कॉलनीतून जास्त प्रमाणात येतात.ही मुल गरीब आदिवासी असली तरी अभ्यासात आणि खेळात खूप हुशार आहेत.युनिलिव्हर कंपनीचे सभासद आनंद सिंग, नताशा सिंग, देवेंद्र सिंग आदी जातीने उपस्थित होते.विद्यार्थ्याना सहकार्य केल्याबद्दल समर्थ माध्यमिक विभागाचे प्रिन्सिपॉल श्रीकांत वाडेकर यांनी युनिलिव्हर कंपनी आणि रॉबिनहुड आर्मीचे आभार व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजसेवक गणेश हिरवे, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सुनीता निंबाळकर आणि रॉबिनहुड चे अक्षय संघवी सिद्धेश कुलकर्णी, दृष्टि शाह
यांनी खूप मेहनत घेतली.किराणा किट मिळाल्याने विधार्थी खूप आनंदित होते.
Gd
Good work by Hul company by donating books for needy students