
प्रतिनिधी :सुरेश बोरले
हर एक का दिन आता है! नियतीचा नियम हा सगळ्यांना लागू आहे.आधी जीवनात दुःख मग सुख, आधी सुख आल, तर मग अंतिम टप्प्यात दुःख असेलच. हे नियतीच कालचक्र आहे. आपण पहा जेव्हा जेव्हा पाहिलं आहे की, विश्वात अति अत्याचाराचा आघात झाला. त्यावेळेस नियतीने लोकांच्या मनात क्रांतीची ज्योत पेटवली.त्या क्रांतीने त्या दाहाचा भस्मासुर झाला. आधी अति अत्याचार, मग क्रांती! हे समिकरण झालं. अशी किती तरी जगातील उदाहरणे देता येतील. नुकतीच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी क्रांति घडली. एका महत्त्वाच्या पक्षाचे काही आमदार एकदम एका फटक्यात,राष्ट्रीय पातळीवरच्या पक्षा सोबत गेले व महाराष्ट्रातील आघाडी सरकार कोसळले. या पडद्यामागचा गेम फार मोठा होता . असा लोकांचा मत आहे.तो म्हणजे प्रत्येक आमदाराला धारेवर धरण्यात आले. कुणाची काळी कमाई, कोणाची संपत्ती आड मार्गाने कमावलेली.त्याविरुद्ध राष्ट्रीय स्तरावर असणाऱ्या पक्षाने,त्यांचे बिंग फोडण्याचा तगादाच त्यांच्या मागे लावला. एक तर आमच्या प्रवाहमध्ये सामील व्हा! नाहीतर मग ई डी चौकशी किंवा सीबीआय चौकशीला तयार राहून तुरुंगात जायला तयार राहा. या प्रकरणात असा लोकांचा दाट संशय आहे. अशा प्रकारची चर्चा लोक आपसात करीत आहेत. यामध्ये कितपत सत्य आहे, हे ते 40 आमदारांनाच माहित व राष्ट्रीय पक्षाला पण दाल मे कुछ काला है,हे सत्य आहे,ते नाकारता येत नाही. ज्या पक्षा बरोबर संजय राऊत इमानदारीत राहिले. त्या पक्षातील लोकांच्या मागे चौकशी लागली आहे.त्यामध्ये ऍडव्होकेट.अनिल परब आहेत, अजून काही असतील पण सामना ह्या लोकप्रिय वर्तमानपत्राचे संपादक, संजय राऊत हे सुद्धा आपल्या पक्षांवर ठाम राहिले. संजय राऊत यांनी सार्वजनिक भाषण करण्याची व विरुद्ध बोलण्याची ढब आहे.प्रत्येकाची आपली भाषणाची शैली असते.ती पण कुणाला आवडते कोणाला आवडत नाही. परंतु नेता मात्र आपली कास काही सोडत नाही. नुकताच संजय राऊतांवर, गोरेगावच्या प्रकरणात, त्यांना तुरुंगवासही झाला तो त्यांनी स्वीकारला. पण आपल्या पक्षाबरोबर ते इमानी राहिले. त्या प्रकरणाची सत्यता, असत्यता काहीही असो, पण आपल्या निर्णयावरती ठाम राहिले, हे महत्त्वाचे आहे. आता ते आपल्या पक्षासाठी किरीट सोमय्या यांची,
भूमिका निभावताना दिसत आहेत. ज्या पक्षाने आपला पक्ष फोडला,आपल्याला वेगळे केले, आपल्याला जेल ची हवा खावी लागली, आता ते समोरच्या विरोधी पक्षातील राजकारण्यांचा घोटाळा बाहेर काढून तो चव्हाट्यावर आणण्याच्या तयारीत आहेत. एक चांगला पायंडा ते पाडीत आहेत.कारण आमचे घोटाळे आपण बाहेर काढता!मग तुमचे कोणी काढायचे? नुकताच संजय राऊत यांनी एका साखर कारखान्याचा मोठा घोटाळा मोठा बाहेर काढण्याचे काम पुराव्या सहित केलेले आहे.त्या संदर्भात ,त्यावर कारवाई करा!असे पत्र नुकतेच उप मुख्य मंत्र्यांना पाठवलेल आहे. पण त्यावर काही या प्रकरणात कारवाई झालेली नाही. म्हणून राऊत ,आता एक पाऊल पुढे गेलेले आहेत. त्यांनी आता सीबीआय चौकशीची मागणी केलेली आहे. आता या प्रकरणात जनतेला कळेल की राष्ट्रीय पातळीवर असणारा पक्ष काय करतोय? ईडी म्हणा सीबीआय म्हणा,पोलीस म्हणा, न्यायालय म्हणा या सगळ्या सरकारी संस्था आहेत. पण या सगळ्या संस्था राष्ट्रीय पक्षाच्या दबावाखाली आहेत का? किंवा राजकीय दबाव आणून ते प्रकरण दाबतात का?जनतेला पाहायचे आहे. कारण 40 माणसांच्या मागे लागलेला ससे मीरा व त्यांचा घुमजाव पवित्रा, हा राजकीय दबावाने प्रेरित होता का?ते आता जनते समोर यावे अशी जनतेची इच्छा आहे. कारण तुम्ही राष्ट्रीय पक्षात सरशीत आहात, तुम्हाला विरोध नको का? तुम्हीच तेवढे फक्त स्वच्छ! तुम्हीच फक्त धुतलेल्या तांदळासारखे पांढरे, बाकीचे सगळे मलिन आहेत. असा एकतर्फी एक कलमी कार्यक्रम आता पहायचा आहे का? पाहू, सध्या संजय राऊत हे कार्य करत आहेत त्यामध्ये त्यांना यश येते का? सत्य पुरावे सादर करून. जर हे प्रकरण आतल्या आत मिटवल गेल तर,मग राष्ट्रीय पक्ष एकापात्री नाट्य प्रयोग करतोय हे सिद्ध होईल.असे काही लोकांना वाटते. राष्ट्रीय पक्षातील काही माणसे,हातात हातोडा घेऊन मिरवतात, त्याप्रमाणे आता नवीन किरीट सोमय्या संजय राऊत यांच्या रूपात,येत आहेत. सौ. सोनार की,एक लोहार की करायला?