संविधानाचा सन्मान करणाऱ्यासोबत काँग्रेस:वर्षा गायकवाड.

Share

प्रतिनिधी : मिलन शहा

मुंबई : काँग्रेस पक्ष व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला पवित्र असे संविधान दिले. हजारो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेला छेद देऊन सर्व जाती धर्माच्या लोकांना, महिलांना अधिकार व हक्क दिला. मनुस्मृतीवर आधारित भारत देश उभा करणा-यांना मोठी चपराक देऊन काँग्रेसने लोकशाही व संविधान स्वीकारून सर्वांना सोबत घेऊन शेवटच्या माणसापर्यंत विकासाची फळे पोहोचवण्याचे काम काँग्रेस सरकारने केले पण मागील 11 वर्षापासून देशात जातीयवादी व धर्मांध शक्ती सत्तेत असून जातीयवादी व धर्माचे विष कालवले जात आहे. काँग्रेस पक्ष लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी लढत असून या लढाईत जे सोबत येतील त्यांच्यासोबत हा लढा लढू असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षाताई गायकवाड यांनी म्हटले आहे.
उत्तर भारतीय सेलच्या वतीने आयोजित उत्तर भारतीय सम्मेलन उत्तर पश्चिम जिल्ह्यात मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष अवनीश सिंग, महेश मलिक, मुख्य प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस,धनंजय तिवारी , रामसेवक यादव, गफ़ूर साहेब, ओमप्रकाश गुप्ता, एम एम यादव, संतोष सिंह , सूर्यकांत मिश्रा ,रामसेवक यादव ,कश्मीरी साहेबआदी उपस्थित होते.
यावेळी खासदार वर्षाताई गायकवाड पुढे म्हणाल्या की, काँग्रेस पक्षाने उत्तर भारतीय समाजाला आमदार, खासदार, मुंबई काँग्रेस अध्यक्ष, महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते, मंत्री ,अशी अनेक पदे दिली. महायुती सरकारच्या काळात मात्र उत्तर भारतीय समाजाला दुय्यम वागणूक देण्यात येत आहे. निवडणुकीपूर्वी उत्तर भारतीय समाजाला गोंजारण्याचे काम केले जाईल, आपण सर्वांनी सावध राहिले पाहिजे आणि त्यांचा डाव हाणून पाडला पाहिजे. एक दुसऱ्याच्या भाषेचा, संस्कृतीचा सन्मान करण्याचे काम पुरोगामी महाराष्ट्राने केले आहे. उत्तर भारतीय फेरीवाल्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या न्यायासाठी महानगरपालिकेच्या विरोधात मोठे आंदोलन केले जाईल.

फेरीवाल्यांच्या हिताचा कायदा झाला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी मोठा लढा उभारला पाहिजे. देशातील मोठ मोठ्या उद्योगपतींना कर्ज माफ केले जाते पण मुंबईतील गरीब फेरीवाल्यांना सत्ताधारी आमदारांकडून लाथाबुक्यांनी मारहाण केली जाते आहे. मुंबईतील फेरीवाल्याचा होणारा छळ आणि लूट महायुती सरकारने थांबवावी असे आवाहन खासदार वर्षाताई गायकवाड यांनी केले. उत्तर भारतीय समाजाला अवनीश सिंग यांच्या नेतृत्वात न्याय मिळवून देण्याचे काम नक्की केले जाईल याचा मला विश्वास आहे असेही खासदार गायकवाड म्हणाल्या..


Share

2 thoughts on “संविधानाचा सन्मान करणाऱ्यासोबत काँग्रेस:वर्षा गायकवाड.

  1. एस सी एस टी ॲक्ट कायद्यामुळे संविधानाचा अपमान होत आहे. त्यामुळे सर्व जातीला ॲट्रॉसिटी लागू करण्यात आला पाहिजे. विशिष्ट जातीला शिवीगाळ अपमान करणे ॲट्रॉसिटी आणि इतर जातींना शिवीगाळ अपमान करणे हा ॲट्रॉसिटी नाही हा भेदभाव निर्माण करणारा कायदा आहे. त्यामुळे संविधानातील अनुच्छेद १४,१५,१६,२१ नुसार समानता येईल आणि जातीभेद संपेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *