एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक
मुंबई -चारकोप सह्याद्री नगर ज्ञानवर्धिनी विद्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला. दिनांक २६ नोव्हेंबर या ऐतिहासिक दिवशी आयोजित कार्यक्रमाला विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य महादेव भिंगार्डे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली.
कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक डी. सी. गावीत यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी आपल्या भाषणात संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुतेच्या मूल्यांवर भर देत विद्यार्थ्यांना संविधानाचे पालन आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले.
यानंतर विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. त्यापाठोपाठ ज्येष्ठ शिक्षिका शशिकला जाधव यांनी संविधान दिनाचे महत्त्व प्रभावी शब्दांत मांडत विद्यार्थ्यांना लोकशाही आणि नागरिक कर्तव्यांची जाणीव करून दिली. विद्यार्थीनी एंजेल साठे हिने संविधान दिनाचे महत्त्व आकर्षक व प्रभावी शैलीत व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे महादेव भिंगार्डे यांनी विद्यार्थ्यांना संविधानाची वैशिष्ट्ये, त्यामागील महान विचारवंतांचे योगदान आणि संविधानाचे आजच्या आधुनिक भारतातील महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुयोग्य सूत्रसंचालन पाटील सरांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन जाधव, व्ही. व्ही. पाटील, गिरीष पंडोरिया, वर्षा शेडगे, गायकवाड मामा आणि बाईत ताई या सर्व रयत सेवकांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले.
विशेष म्हणजे, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य व माजी विद्यार्थी संघटनेचे घनश्याम देटके यांनी विद्यालयासाठी “संविधान सेल्फी पॉइंट” तयार करून दिला, याबद्दल विद्यालयातर्फे त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी चारकोप परिसरात प्रभात फेरी काढत संविधानिक मूल्यांवरील घोषणा देत जनजागृती केली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली
Good
खुप छान
Khup chan