प्रतिनिधी :मिलन शहा

मुंबई,भाजपा व संघ परिवारातील लोक सातत्याने संविधान बदलण्याची जाहीर विधाने करत असतात. आताही पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार विवेक देबरॉय यांनी संविधान बदलण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी संविधानाचा मुळ गाभा बदला अशी मागणी केली आहे. रंजन गोगोई निवृत्ती नंतर भाजपाच्या तिकिटावर राज्यसभा खासदार झाले आहेत. संविधान बदलण्याची भाषा भाजपा व संघ या लोकांच्या माध्यमातून करत असते या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, शिवाजी पार्क ते चैत्यभूमी, दादर पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या “संविधान बचाव पदयात्रेत” कार्यकर्त्यांसोबत सहभागी होऊन संविधान रक्षणाची शपथ घेतली.