
.
प्रतिनिधी :मिलन शहा
मुंबई,विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तसेच समाजाच्या प्रलंबित मागण्या मान्य करून घेण्यासाठी मातंग व तत्सम समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाचे नियोजन करण्यासाठी सकल मातंग समाज समन्वयकांची राज्यस्तरीय बैठक दिनांक24 जून रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती सकल मातंग समाज राज्य समन्वयक व प्रसिद्धी प्रमुख सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली आहे.
या बैठकीत सकल मातंग समाजाचे राज्यभरातील सर्व समन्वयक सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 20 जुलै रोजी करण्यात येणाऱ्या लहुतिर्थ संगमवाडी, पुणे ते आझाद मैदान, मुंबई “अ.जा. आरक्षण वर्गीकरण” दवंडी यात्रा व आगामी काळात सकल मातंग समाजाच्या वतीने राज्यभरात करण्यात येणाऱ्या आंदोलनासंदर्भात सखोल चर्चा करण्यात येणार असून आंदोलनाचे स्वरूप निश्चित करण्यात येणार आहे, असेही राजहंस म्हणाले.