
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
१६६ अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक क्षेत्राचे अधिकारी राजेश खरात आणि सतीश मिठबावकर यांना नुकताच जोगेश्वरी पूर्वेतील अस्मिता शाळेतील हॉल मध्ये जॉय ऑफ गिविंग संस्थेच्या वतीने दहाव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार २०२५ देऊन गौरविण्यात आले.हे दोघेही कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सर्वांना परिचित असून अनेक लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका इलेक्शन मध्ये त्यांनी चांगले काम केलेले आहे.प्रमुख पाहुणे जोगेश्वरी भूषण डॉ एम डी वळंजू, कामगार नेते अविनाश दौंड, मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आणि सामाजिक जाणीव ठेऊन काम करणारे जगदीश जायले, कुर्ला भूषण सत्येंद्र सामंत, डॉ महेश अभ्यंकर, कौन्सिलर ॲड रुषीला रिबेलो, ज्येष्ठ पत्रकार संपादक राजेंद्र घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार कार्यक्रम छान रंगला.खरात आणि मिठबावकर यांनी कारोना काळात देखील अग्रेसर राहून अनेकाना सहकार्य केले होते असे जॉय चे संस्थापक अध्यक्ष गणेश हिरवे यांनी सांगितले.यावेळी अस्मिता संस्थापक दादा पटवर्धन, शिक्षक नेते जनार्दन जंगले, ज्येष्ठ पत्रकार विश्वनाथ पंडीत यांचा देखील जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

अभिनंदन