
एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक.
कबनूर : सत्यशोधक फाउंडेशन आणि राष्ट्र सेवा दल, कबनूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सेवा पुरस्कार प्रदान सोहळा–२०२५ अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
साथी के. एम. आवळे सर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने झाली. अमोल पाटील यांनी स्वागत केले. प्रा. रविंद्र पाटील यांनी प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख करून दिली. साथी पन्नालाल सुराणा आणि डॉ बाबा आढाव यांना सभेवतीने आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी विचारवंत साथी शिवाजी परुळेकर म्हणाले की, राष्ट्र सेवा दलाचे काम वाढवण्यासाठी सेवाभावी ,समर्पित कार्यकर्ता यांनी समाजशिक्षकाच्या भूमिकेत जावे लागेल. प्रमुख पाहुणे मार्गदर्शन करताना राष्ट्र सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष साथी रावबाहेब आलासे यांनी सेवाभाव, समता आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व अधोरेखित केले. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित माजी चेअरमन साथी पी. एम. पाटील व मधुकर मणेरे यांनी पुरस्कारार्थींना शुभेच्छा देत सामाजिक कार्यात सातत्य राखण्याचे आवाहन केले.
यावेळी कला सेवा पुरस्कार साथी विजय टिपुडे (कोल्हापूर), साहित्य सेवा पुरस्कार साथी प्रा. डॉ. शामसुंदर मिरजकर (सातारा), सामाजिक कार्य सेवा पुरस्कार साथी सुषमा साळुंखे (इचलकरंजी) आणि पर्यावरण कार्य सेवा पुरस्कार साथी संजय म्हेतर (कबनूर) यांना प्रदान करण्यात आले. तसेच जिल्हास्तरीय पोस्टर स्पर्धा आणि बालवाडीसाठी रंगभरण स्पर्धेच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी डॉ. प्रदीप आवळे, सयाजी देसाई, मारुती आवळे, विनायक सपाटे, प्रमोद आवळे, आरिफ पानारी, इंद्रायणी पाटील, रोहित दळवी आदिंनी प्रयत्न केले. यावेळी सुनिल स्वामी, पंडित कांबळे, मच्छिंद्र आंबेकर, लता माने, कुंदन आवळे, रुचिता पाटील, स्नेहल माळी, तानाजी आवळे, सुनिल पोवार यांच्यासह अनेक मान्यवर व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. संजय रेंदाळकर यांनी सूत्रसंचालन केले तर नौशाद शेडबाळे यांनी आभार मानले.
फार सुन्दर असे सोहळा सतत झाले पाहिजेत
Greatest congratulations
Congratulations