
प्रतिनिधी : वैशाली महाडिक
मुंबई: दिनांक १ ऑक्टोबर २०२५ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि मुंबई फॉर पीस यांच्या संयुक्त विद्यमाने समतेचा गरबा हा सर्वसमावेशक आणि उत्साही गरबा महोत्सव मुंबईचा आंबेडकर भवन, दादर येथे संपन्न झाला. धर्म, जात आणि लिंग यांच्या पलीकडे जाऊन सर्वांना सामावून घेणारया पा कार्यक्रमाने मुंबईतील सामाजिक आणि सांस्कृतिक विविधतेयं सुंदर प्रतिबिंब दाखवून दिलं
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्क्षात आलेला हा कार्यक्रम केवळ गरब्याचा मृत्ासोहळा नव्हता, तर तो द्वेष, असहिष्णुता आणि जात-धर्माचारित विघटनाविरुद्धचा एक सकारात्मक आणि सांस्कृतिक संदेश होता.
सावधपणे निवडलेल्या संगीताच्या यादीतून समानता, मैत्री आणि संविधानिक मूल्यांचा गौरव करण्यात आला आणि कार्यक्रमात सहभागी झालेल्या १५० हून अधिक तरुण आणि ज्येष्ठ मुंबईकरांना मंत्रमुग्ध केलं. तीन तास चाललेल्या या कार्यक्रमात उत्साह, ऊर्जा आणि एकोप्याचं वातावरण निर्माण झालं होतं. कार्यक्रमाच्या शेवटी उत्कृष्ट नृत्य करणाऱ्यांना आणि सहभार्गीना पुरस्कार देण्यात आले.
समतेचा गरबा हा मुंबई फॉर पीस या व्यासपीठाने पुढील काही महिन्यांत आयोजित केलेल्या सांस्कृतिक उपक्रमांच्या मालिकेतील एक भाग होता. या उपक्रमांचा उद्देश द्वेष आणि सांप्रदायिकतेला विरोध करणे आणि मुंबईचं प्रेमळ, सहिष्णु व समावेशक स्वरूप जपणं हा आहे.मुंबई फॉर पीस हे मुंबईतील सामाजिक सलोखा, सहिष्णुता आणि धार्मिक ऐक्य जमम्मासाठी काही जागरूक नागरिकांनी स्थापन केलेले व्यासपीठ आहे

फारच छान असे उपक्रम सतत व्हायला हवे
Msst
Very good