
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
राष्ट्र सेवा दल गोरेगांवच्या वतीने गेली ४० वर्ष स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला हुतात्म्यांना अभिवादन करत रात्री 12 वाजता झेंडावंदन केलं जातं. आजवर लोकनेत्या मृणालताई गोरे यांच्या उपस्थितीत सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर, कलावंत सहभागी झालेले आहेत. या कार्यक्रमाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे.यावर्षीही केशव गोरे स्मारक ट्रस्ट आणि राष्ट्र सेवा दल गोरेगांव मिळून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा हभप श्यामसुन्दर सोन्नर महाराजांचं ‘समतेची वारी’ हे सुश्राव्य किर्तन आयोजित केलं आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते निरूपण करतील.
हा आगळा वेगळा कार्यक्रम 14 ऑगस्टच्या रात्री 9 वाजता केशव गोरे स्मारक ट्रस्ट, आरे रोड, गोरेगांव, पश्चिम येथे होणार आहे. निमंत्रक केशव गोरे स्मारक ट्रस्ट आणि राष्ट्र सेवा दल, गोरेगांव.