
प्रतिनिधी : वैशाली महाडिक
कुरुंदवाड : साधना मंडळ, कुरुंदवाडच्या सभागृहात पुणे येथे होणाऱ्या समाजवादी 90 राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्र सेवा दल कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील कलापथकाचे कार्यकर्ता यांनी पुर्वतयारी कार्यशाळा संपन्न केली.
यामध्ये गाणी, नृत्य आणि नाटक अशा तीन अंगाने होणारी सादरीकरणे काय असतील याचे नियोजन करुन सराव घेण्यात आला. यांचे संयोजन सदाशिव मगदूम, बाबा नदाफ आणि संजय रेंदाळकर यांनी केले होते.
या कार्यशाळेला जिल्हा कार्याध्यक्ष अनिल होगाडे, कोशाध्यक्ष अशोक चौगुले, जयप्रकाश जाधव आणि बबन बन्ने यांनी सदिच्छा भेट दिली. यामध्ये राज्य मंडळ सदस्य Indrayani Patil , राज्य संघटक रोहित शिंदे, जिल्हा संघटक रोहित दळवी, कलापथक प्रमुख दामोदर कोळी, मुस्तफा शिकलगार, किरण कांबळे, रविराज शितोळे, कोमल मगदूम आणि युवराज मगदूम आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
खूपच छान
Great