एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले
मुंबई: सामाजिक कार्यकर्ते जमील मर्चंट यांनी मुस्लिम समुदायाला लक्ष्य करून समाज माध्यमावर आक्षेपर्य भाषा वापरणाऱ्यांविरुद्ध मालवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी सर्वोच्च न्यायालयाविरुद्धही आक्षेपर्य भाषेचा वापर केल्याचे कळते.
काही इंस्टाग्राम आयडींचा हवाला देत तक्रारीत म्हटले आहे की काही लोकांनी इस्लाम धर्माचे संस्थापक पैगंबर मुहम्मदl यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. ते मुस्लिम समुदायाविरुद्ध द्वेष व्यक्त करण्यासाठी अपशब्द वापरत आहेत. एफआयआरमध्ये गौरव राजपूत आणि अभिषेक ठाकूर यांचा इन्स्टाग्रामवर अशा भडकाऊ भाषेचा वापर करणाऱ्या व्यक्ती म्हणून उल्लेख आहे. पोलिसांनी एफआयआर १४८२ मध्ये आयपीसीच्या कलम १९६, ३५२ आणि ६६(अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू आहे.
जमील मर्चंटच्या मते, त्यांनी अशा डझनभराहून अधिक इंस्टाग्राम आयडींबद्दल पोलिसांना माहिती दिली आहे, जे देशाच्या वेगवेगळ्या भागातून कार्यरत आहेत. ते अनेकदा दोन समुदायांमध्ये हिंसाचार भडकवणारी विधाने करतात, ज्यामुळे देशातील वातावरण बिघडण्याचा धोका असतो. त्यांनी पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अशा समाजकंठकांना वेळीच रोखायला हवे!
आक्षेपर्य भाषा वापरून जाणूनबुजून अशी हिंसाचारयुक्त विधाने करून देशाचे तसेच राष्ट्राचे वातावरण बिघडवणाऱ्या काही समाजकंठकांवर पोलिसांनी वेळीच कारवाई करायला हवी जेणेकरून भविष्यात अशी लोकं उलट, सुलट बोलून पुन्हा आक्षेपर्य भाषेविरुद्ध बोलायची हिंमत करणार नाही.
Good