समीर वानखेडेचे समर्थन करणारे भाजपा नेते आता गप्प का?

Share

प्रतिनिधी :मिलन शहा

ब्लॅकमेलर, खंडणीखोर अधिकारी समीर वानखेडे देशभक्त कसा? :–सुरेशचंद्र राजहंस.


मुंबई,
वादग्रस्त सरकारी अधिकारी समीर वानखेडेने एनसीबी विभागात असताना केलेले एक-एक प्रताप बाहेर येत आहेत. वसुलीसाठी स्वतःची गँग करुन सेलिब्रिटींना ब्लॅकमेल करणारा वानखेडे आता स्वतः देशभक्त असल्याचा आव आणत आहे. पदाचा दुरुपयोग करुन आपण केलेले ‘प्रताप’ आता उघड झाले असल्याने वानखेडे बचाव करण्यासाठी देशभक्त असल्याचा कांगावा करत आहे. वसुलीबाज, खंडणीखोर, ब्लॅकमेलर वानखेडे देशभक्त कसा, असा सवाल काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी विचारला आहे.
समीर वानखेडेने अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह इतर अनेक नामांकित व्यक्तींना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत कोट्यवधी रुपयांची माया जमवल्याचा गंभीर आरोप आहे. शाहरुख खानकडे २५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे उघड झाले आहे. वानखेडेने आपल्यालाही ड्रग प्करणात अडकवल्याचा आरोप मॉडेल मुनमुन धमेचा हीने केला आहे. सीबीआय आता वानखेडेची चौकशी करत आहे पण वानखेडेचे असे अनेक प्रताप आहेत, सखोल चौकशी केल्यास वानखेडेने केलेले अनेक प्रताप उजेडात येतील, वानखेडे सारख्या भ्रष्ट अधिकाऱ्यावर कडक कारवाई केली पाहिजे.

भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांच्यासह अनेकांनी त्यावेळी समीर वानखेडेचे जोरदार समर्थन केले होते. आता वानखेडेचे पितळ उघडे पडले असल्याने भातखळकर सारखे उतावीळ नेतेही उघडे पडले आहेत. आता ते वानखेडे प्रकरणार गप्प बसले आहेत. वादग्रस्त अधिकाऱ्याचे समर्थन केल्याबद्दल आता भातखळकरांसह भाजपा नेत्यांनी खुलासा केला पाहिजे, असेही राजहंस म्हणाले.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *