सरकारला घालवण्याची वेळ आलेली आहे का?

Share


प्रतिनिधी :सुरेश बोर्ले

मुंबई: समाजात फक्त सत्याचाच बोलबाला असतो. खोटारडेपणाचा “असत्य”बाणा हा क्षणिक किंवा वेळ मारून नेण्यासाठी असतो.शेवटी विजय हा सत्याचाच होतो.असेच कांहीं खोटारडेपणाचे प्रकार आज महाराष्ट्रात घडत आहेत आणि ते घडवत आहेत, स्वतःवर्तमान मुख्यमंत्री!आपण त्यांचा पाढा थोडक्यात वाचू.
मा. मुख्यमंत्री म्हणतात,की जे हिंदी भाषेला आज विरोध करीत आहेत. इंग्रजीला म्हात्र नाही!ज्यांनी मराठीवर प्रेम दाखवल, त्यांची मुलं ही मुंबईतील “स्कॉटिश”ह्या उच्च इंग्रजी माध्यमात शिकलेली आहेत.निशाणा कोणावर आहे हे जनतेने समजावे.अरे बेरक्यांनो त्यांची मुलं स्कॉटिश शाळेत. शिकली!त्याचा तुम्ही विनाकारण बाजार करताय.मुख्यमंत्री साहेब,तुमची मुलगी “कॅथेड्रल जॉन कॅनन” ह्या उच्च इंग्रजी शाळेत शिकली.त्याच काय?ही काय मराठी शाळा आहे का?तुमची मुलगी मराठी शाळेत शिकली आहे का?तर तुम्हाला विरोधात बोलण्याचा अधिकारी आहे. ह्या तिच्या उच्च इंग्रजी शाळेत हिंदी व इंग्रजी सक्तीची भाषा आहे आणि मराठी तिसऱ्या स्थानी पर्यायी आहे.ती पाहिजे तर घ्या नाहीतर सोडा.तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत. दुसऱ्यानवर चिखल उडवताना आपला चेहरा आधी आरश्यात पहावा.ती विरोधी पक्षातील मूल राजकारणात तुमच्या विरोधात आहेत,म्हणून हा बाजार मांडायचा,हे बर आहे का? .आपण काय मराठी अस्मिता जपणार.एक पेक्षा एक मुखमंत्री ह्या महाराष्ट्रात झाले. त्यांच्या कुटुंबाचा पोशाख पहा, पेहराव पहा, शिस्त पहा आणि तुमच्या पहा.तुम्ही काय मराठी अस्मिता जपणार!हे अशी लोकां मध्ये चर्चा सुरु आहे.तुमची मुलगी राजकारणात तरी ती कोणत्या शाळेत शिकते या वर ही चर्चा सुरु आहे..त्यामुळे महाराष्ट्राला वळण लावायचा आपल्याला अधिकार आहे का?? आपल्याच काळात राज्यात
मोठ्या मोठ्या उद्योग पत्तींच्या व राजकारणी लोकांच्या इंग्रजी शाळा उभ्या राहिल्या,त्या आपल्या व पक्षाच्या स्वार्थाशिवाय काय?असे ही प्रश्न जन्मानसात चर्चा आहे.त्या शालांत हिंदी इंग्रजी सक्ती आणि मराठी तिसरी आणि सक्तीची नाही.अरे
आता डॉ.माशेलकर समितीच्या बद्दल पहा. डॉ.रघुनाथ माशेलकर, सुखदेव थोरात, खासदार.मुणगेकर आदींची आपण नावे घेताय,त्यामध्ये उच्च शिक्षित अर्थतधन्य डॉ.मुणगेकर हे त्या उच्च शिक्षण गठित कमिटीत ते नव्हते.असे त्यांनी स्वतः ट्विट केलेले आहे व हा मुद्दा खोडलेला आहे.मग आपण त्यांचे खोटे नाव का जोडता?हे सुद्धा जनमत आहे.ते आपल्यापेक्षाही सुशिक्षित आहेत.ही कमिटी उचित शिक्षणासाठी होती.त्यावर उद्धवजींच्या सहीत २१ जणांच्या सह्या आहेत.फक्त उद्धवजिंचीच नाही.ही कमिटी प्राथमिक शिक्षणासाठी नव्हतीच,मग तीच खापर का त्यांच्यावर विनाकारण फोडताय.त्यांनी जी आर काढला होता का?तुम्हीच हिंदी सक्तीचा जी आर काढलात आणि महाराष्ट्र परप्रांतियांना विकायला काढलात!किती असत्य केलं आपण!त्याच वेळेला अनेक पक्ष फोडलेत आणि हिंदी सक्तीचा!जी आर काढून स्वतःचा खड्डाही आपण खोदलात, ह्याचा उपयोग जनताच आपल्यासाठी करेल.असे ही जनमत आहे.तो अहवाल तत्कालीन शिक्षण मंत्री उदय सामंत ह्यांच्याकडे गेला साहेब,आपण हे विसरलात.तो स्वतंत्र कक्ष आहे,तेथे मुख्यमंत्री हस्तक्षेप करत नाहीत.मग उद्धवजी कुठे होते?
मतदान किंवा निवडणुकीपूर्वी,
आपण जाहीरनामा जनते समोर जाहीर केलात!त्याची वचन पुरती केलीत का?
विदर्भ वेगळा करीन तेव्हाच विवाह करेन!आपले लग्नही झाले व आपल्याला मुलगीही झाली.ती १०वी पासही झाली.विदर्भ आहे तिकडेच आहे.अजित पवार चक्की पिसिंग अँड पिसिंग करणार होते.त्यांच्या बरोबर आपला आपला पक्ष कधीच जाणार नाही.त्यांना तुम्ही दोनदा उपमुख्यमंत्री त्यांच्या हातात हात घालून बनवले.हे जनतेने सुद्धा पहिले. मा. छगन भुजबळ हे खडी फोडायला जेलमध्ये जातील ही आपलीच वाक्यं जनते ऐकलेली आहेतं. आता ते तुमच्या मंत्री मंडळात आहेत. मा.अशोक चव्हाण ह्यांनी मोठा घोटाळा केलेला आहे. सैनिकांच्या पत्नीनवर त्यांनी अन्याय केला होता.अशी आपलीच ओरड होती.त्यांना आपल्या पक्षात सामील केलात.त्यांच्या घरी पार्ट्या करता हे जनतनेही पाहिलेलं आहे. कुणीतरी सुधाकर बडगुजर आहे,तो उद्धवजींन बरोबर असतो, तो “डॉन”दाऊदचा हस्तक आहे! उद्धवजी यांचाही समंध दुबईशी आहे.ही तुमचीच ओरडही जनतेने पाहिली आहे.त्या बडगुजरलाही आपल्याकडे कमळात ओढलात! हे पण लोकांनी पाहिलेलं आहे.
शेतकऱ्यांच्या मालाला रु१०.००० प्रमाणे हमीभाव देणार होतात?तेथे आपण दहा वर्षांनी रु.४,००० दिलात.पण ते कधी मिळतील? ते अजून शेतकऱ्यांना कळलेल नाही.आधीच कर्ज व आत्महत्या आदी नैराश्याने त्रासलेला बळीराजा त्या पैश्यांची वाट पहात आहे.हे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.आपण सर्व मराठी शाळा बंद करताय!आपल्याला समाज सेवा जमत नसल्यास,आपण राज संन्यास घ्यावा.अशी जनतेची इच्छा आहे.आपण असत्य करताना एकच लक्षात ठेवा!जनमानसाची आपल्याला काळजी नाही.पण वरच्याची तरी करा!तेथे आपल्याला न्याय द्यायचा आहे.हा निसर्गाचा नियम आहे.हा जनतेचा कौल आहे.


Share

One thought on “सरकारला घालवण्याची वेळ आलेली आहे का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *