
वैशाली महाडिक
इचलकरंजी: या काकासाहेब माने मेमोरियल ट्रस्ट इचलकरंजी संचलित मालती माने विद्यालय, इचलकरंजी येथे नाग पंचमी निमित्त सर्प विज्ञान माहिती पट दाखवण्यात आला. होलिस्टिक एनवायर्मेंटल अॅक्टिविटीज यांनी बनवलेले साप : समज – गैरसमज या विषयावर माहिती पट दाखवल्यानंतर चर्चा घडवण्यात आली. संवादक म्हणून मुख्याध्यापक संजय रेंदाळकर यांनी काम केले.
स्वागत अंजना शिंदे यांनी केले. तांत्रिक बाजू सुनिल कोकणी यांनी सांभाळली. सांस्कृतिक प्रमुख मनिषा कांबळे यांनी संयोजन केले. यावेळी रेखा पाटील, अमृता कदम, स्मिता सुतार, सुप्रिया हांडे, धनश्री सुतार यांचेसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बालवाडीत बनी टमटोला विभागानेही सदर कार्यक्रम संपन्न केला.
छान उपक्रम
अंधविश्वास कमी होईल