प्रतिनिधी : सुरेश बोर्ले
मुंबई :उच्च न्यायालयाने, एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या दल बदलू लोकांसाठी कडक कायदा करण्याचा फरमान सरकारला सोडला आहे.हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अतिशय योग्य आहे. कारण मूळ पक्षात यायचे तिकडे येऊन त्या नेत्यांच्या विश्वास संपादन करायचा,त्या पक्षाकडून तिकीट मिळवून निवडणूक जिंकायची. अर्थात त्या पक्षाने असल्या माणसावर विश्वास दाखवून त्या उमेदवाराला तिकीट देऊन ! खर्च करून,मानसिक बळ लाऊन त्याला निवडून आणायचे.मग उमेदवाराने अवैध मार्गाने माया गोळा करायची.ह्या सगळ्या गोष्टी गळ्याशी आल्यावर,मग सरशी तेथे फारशी हा खेळ खेळून,टुणकन उडी मुख्य पक्षातून दुसऱ्या पक्षात मारायची. नाहीतर गटबाजी करून मुख्य पक्षा विरोधात मोठी बंडाळी फितुरी करून, वर्तमान सरकारात जाऊन मंत्रिपदे मिळवायची. उपमुख्यमंत्री व्हायचे! मुख्यमंत्री व्हायचे.हा सरास प्रकार होताना महाराष्ट्रातील राजकारणात दिसत आहेत. ह्याला कुठेतरी चाप!बसला पाहिजे हे खर आहे.नाहीतरी पक्षांतर करताना,”५०खोके एकदम ओके” ही गर्जना जग जाहीर आहे.कारण विष्ठा पाण्यात केली,तर ती येतेच हा निसर्गाचा नियम आहे. महाराष्ट्रात शिंदे गटाने फितुरी करून जो हीन प्रकार केला आहे,त्याला कदाचित सुरुंग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काहीही लागो? पण अश्या गंभीर प्रकारचं चाप हा बसलाच पाहिजे.म्हणून उपमुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब लागोपाठ दिल्ली वाऱ्या करीत आहेत.कदाचिही त्यांचे फुटीरआमदार हे अपात्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.मग हे आमदार घेऊन ते भाजपात विलीन होण्याच्या तयारीत नाही ना? जे नाकारता येत नाही.एक मात्र खर आहे की,शिंदे साहेबांची आता पाचावर धारण बसली आहे! हे नक्की.त्यांच्या बुडाखालची वाळू सरकू लागली आहे.
Rightlysaid
Need stringent law to control such public representative s.
फक्त ताशेरे ..निर्लज राजकर्णयन्ना काय फरक पडणार??