
प्रतिनिधी :मिलन शाह
मुंबई,शिवसेनेतील बंडखोरीनंतर पक्षाचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कुणाचं यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. हा वाद सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापर्यंत गेल्यानंतर आज अखेर घटनापीठाने पक्षचिन्हाचा निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा असल्याचं स्पष्ट केले असले तरी शिंदे गटाला याचा फारसा फायदा होणार नाही असा टोला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी लगावला आहे.
पहिल्यांदा अपात्रतेचा विषय घ्यायचा की निवडणूक आयोगाचा मुद्दा घ्यायचा हा प्रश्न न्यायालयासमोर होता. शिवसेनेचे म्हणणं होतं की आधी अपात्रतेचा विषय पूर्ण करा आणि त्यानंतर निवडणूक आयोगाच्या मुद्द्याकडे जाता येईल मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या दोन वेगवेगळ्या प्रक्रिया आहे आणि निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील विशेष खंडपीठाने शिवसेना पक्ष चिन्हाचा निर्णय निवडणूक आयोग घेईल असा निर्णय दिला आहे.
मुळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्यासह एकूण 16 आमदारांच्या पात्रतेबाबतीत अजून निकाली निघालेला नाही. आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरूच राहणार आहे त्यामुळे या प्रकरणात माननीय सर्वोच्च न्यायालय जोपर्यंत निर्णय देत नाही तोपर्यंत त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार कायम असणार आहे.त्यामुळे राज्यात असलेले शिंदे फडणवीस सरकार हे असंविधानिक असल्याचे राजहंस म्हणाले.
पण तारीख पे तारीख