
फोटो :साइनगर कांदिवलीतील धोकदायक विजेची पेटी.
प्रतिनिधी: वैशाली महाडिक
मुंबई,कांदिवली पश्चिमेकडील साईनगर येथील मुख्य रस्त्यावर अदानी वीज कंपनीचा विद्युत पुरवठा करणाऱ्या पेटी च्या खाली मोठ्याप्रमाणात दगड मातीचा ढिगारा साठल्याने पावसाळ्यात तिथे पाणी साठुन नेहमीच सॉर्ट सर्किट होऊन वीज पुरवठा खंडित होते या बाबत स्थानिक रहिवासी महेश गुप्ता यांनी तक्रार केली आहे. तसेच सदरच्या रस्त्याने मोठ्याप्रमाणात शाळेतील विध्यार्थ्यांची व नागरिकांची रहदारी सुरु असते त्यातच सदरच्या पेटीचे (फीडर पिलर) दरवाजे देखील व्यवस्थित लागत नसल्याने एखाद्या विद्यार्थ्यांचा किंवा नागरिकांचा सदर पेटीतून (फिडर पिलर) विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहिनीला स्पर्श होऊन जीवितहानी होऊन एखादी दुर्घटना होऊ शकते. भविष्यात अशी एखादी दुर्घटना घडल्यास सर्वस्वी अदानी वीज कंपनी चे अधिकाऱ्यांना व कंपनी ला जबाबदार धरण्यात येईल असे पत्र साई नगर येथील सामाजिक कार्यकर्ते महेश गुप्ता आणि रहिवाशांनी अदानी वीज कंपनीच्या कार्यालयाला दिले आहे.
तसेच योग्य ती दखल घेऊन सदरची विद्युत पुरवठा करणारी पेटी (फीडर पिलर) सुव्यवस्थित करण्याची मागणी केली आहे. तसेच काम त्वरित न झाल्यास लोकशाही पद्धतीने जनआंदोलन इशारा देण्यात आला आहे.
Adani electricity should act fast