साने गुरुजी 125 अभियानाची सुरुवात मुंबईतून…

Share

प्रतिनिधी :वैशाली महाडिक

 मुंबई,साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट आयोजित 

साने गुरुजींच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्ताने त्यांनी दिलेला “खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे” हा विचार समाजात नव्या रुपात प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी राज्यभरातील 80 हून अधिक संस्था, संघटनानी पुढील वर्षभर साने गुरुजी 125 अभियान  चालाविण्याचा निर्धार केला आहे. साने गुरुजी 125 अभियान  प्रारंभ मेळावा गुरूवार  दि. 21 डिसेंबर रोजी, यशवंतराव चव्हाण सेंटर , मंत्रालयाजवळ , चर्चगेट येथे दुपारी 4 वाजता  औपचारिक करण्यात येणार आहे.कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजी आरोग्य मंदिर, सांताक्रुझ येथील ”स्मितालया” च्या नृत्याविष्काराने होईल. प्रसिद्ध लेखक, कबिराचे मर्मज्ञ अभ्यासक पुरुषोत्तम अगरवाल, दलित चळवळीचे अभ्यासक भंवर मेघवंशी,  समिक्षक, संशोधक, संपादक प्रा.रमेश वरखेडे, साने गुरूजींच्या साहित्याच्या अभ्यासक डॉ. चैत्रा रेडकर, ज्येष्ठ सामजिक कार्यकर्ते आणि अभियान प्रतिनिधि डॉ. संजय मं. गो., साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष प्रमोद निगुडकर  यांच्या सह राष्ट्रिय पातळीवरील मान्यवर विचारवंत या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. 

 


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *