प्रतिनिधी :मिलन शहा
मुंबई :साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे या महान समाजसुधारकाचे स्मारक व्हावे ही मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे. जयंती व पुण्यतिथीला अण्णाभाऊंच्या कार्याची आठवण करत स्मारक उभारण्याच्या घोषणा केल्या जातात पण या घोषणा पुन्हा हवेतच विरतात. आतातरी सरकारने अण्णा भाऊ साठे यांचे मुंबईत भव्य स्मारक व्हावे यासाठी तातडीने कार्यवाही करावी.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे नायक अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव जगभर केला जातो. रशियानेही अण्णा भाऊंच्या कार्याची दखल घेत मास्को शहरात पुतळा उभारला, लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहून त्याचे श्रेय लाटण्याचे काम तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतात पण अण्णांच्या जन्मभूमीत, महाराष्ट्रात भाजपा सरकारच्या काळात मात्र त्यांची उपेक्षा होत असल्याचे दिसत आहे.
Naman
Manmouji singer