सुनीता विल्यम्स शिवाय अंतराळयान पृथ्वीवर परतले.

Share

File photo
प्रतिनिधी :मिलन शहा

अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि तिचा साथीदार बुश विल्मोर यांना अंतराळ स्थानकावर घेऊन जाणारे अंतराळयान ३ महिन्यांनंतर सुरक्षितपणे पृथ्वीवर उतरले आहे. 3 मोठे पॅराशूट आणि एअरबॅगच्या मदतीने ते सुरक्षितपणे उतरले. अमेरिकेतील न्यू मेक्सिको राज्यातील व्हाईट सँड स्पेस हार्बर (वाळवंट) येथे सकाळी 9.32 वाजता ते उतरले. अंतराळयानामध्ये झालेल्या समस्येमुळे ते दोन्ही अंतराळवीरांशिवाय पृथ्वीवर परतले आहे. म्हणजे सुनीता विल्यम्स आणि बुरी विल्मोर यांना स्पेस स्टेशनवर पाच ते सहा महिने घालवावे लागतील. फेब्रुवारी 2025 मध्ये स्पेसएक्स क्रू-9 द्वारे दोन्ही अंतराळवीरांना परत आणण्याची योजना आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *